राम चरणच्या चिमुकलीचा नामकरण सोहळा; अंबानी कुटुंबाने गिफ्ट केला सोन्याचा पाळणा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 14:25 IST2023-06-30T14:24:53+5:302023-06-30T14:25:41+5:30
साउथ सुपरस्टार राम चरण आणि उपासना 11 वर्षांनंतर आई-वडील झाले आहेत. आज त्यांच्या गोंडस मुलीचा बारशाचा कार्यक्रम आहे.

राम चरणच्या चिमुकलीचा नामकरण सोहळा; अंबानी कुटुंबाने गिफ्ट केला सोन्याचा पाळणा...
साउथचा सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना काही दिवसांपूर्वीच आई-वडील झाले आहेत. 11 वर्षांनंतर राम आणि उपासना यांच्या घरात छोट्या पाहुण्याचे आगमन झाले. रामचरणने सोशल मीडियावर चिमुकलीसह फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. आज हैदराबादमध्ये या चिमुकलीचा नामकरण सोहळा होणार आहे. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रामचरणच्या मुलीसाठी एक महागडे गिफ्ट दिले आहे.
आज मुलीचा नामकरण सोहळा
राम चरण आणि उपासना कोनिडेला यांच्या मुलीचा नामकरण सोहळा त्यांच्या हैदराबाद येथील घरी होणार आहे. त्यांनी त्यांच्या मुलीसाठी एक खास नाव निवडले असून, आज पारंपारिक समारंभात तिचे नाव ठेवले जाणार आहे. अतिशय भव्य-दिव्य अशा या सोहळ्यात त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटी सामील होणार आहेत.
अंबानी कुटुंबाने दिले खास गिफ्ट
पिंकविलाच्या वृत्तानुसार, अंबानी कुटुंबाने रामचरण आणि उपासना यांच्या मुलीसाठी एक खास सोन्याचा पाळणा भेट दिला आहे. हा सोन्याचा पाळणा खूप महाग असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राम चरण आणि उपासना 20 जून 2023 रोजी एका गोंडस मुलीचे पालक झाले. शनिवारी राम चरणने आपल्या मुलीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.