तमन्ना भाटियाला गिफ्ट मिळाला जगातील 5 वा सर्वात मोठा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 01:34 PM2019-10-09T13:34:55+5:302019-10-09T13:36:38+5:30

साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट सध्या जाम चर्चेत आहे. पण या चित्रपटाची हिरोईन तमन्ना भाटिया ही चिरंजीवी यांच्यापेक्षाही अधिक चर्चेत आहे.  

ram charan wife gifted world 5th biggest diamond worth rs 2 crore to tamannaah bhatia | तमन्ना भाटियाला गिफ्ट मिळाला जगातील 5 वा सर्वात मोठा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्

तमन्ना भाटियाला गिफ्ट मिळाला जगातील 5 वा सर्वात मोठा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट सुरेन्द्र रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि चिरंजीवीचा मुलगा राम चरण याने प्रोड्यूस केला आहे.

साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट सध्या जाम चर्चेत आहे. पण या चित्रपटाची हिरोईन तमन्ना भाटिया ही चिरंजीवी यांच्यापेक्षाही अधिक चर्चेत आहे.  या सिनेमातील तमन्नाच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होत आहे. केवळ पे्रक्षकच नाही तर चिरंजीवीची सूनबाई ( चिरंजीवीचा मुलगा व अभिनेता राम चरणची पत्नी उपासना कोनीडेला ) सुद्धा तमन्नाचा अभिनय पाहून भारावून गेली आहे.  इतकी की, तमन्नाचा ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’मधील अभिनय पाहून तिने केवळ तमन्नाचे कौतुक केले नाही तर तिला एक खास हिरेजडीत अंगठी भेट दिली. खास यासाठी की, या अंगठीत बसवलेला हिरा जगातील सर्वात मोठ्या पाच हि-यांपैकी एक आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण या अंगठीची किंमत जवळपास दोन कोटी आहे. 
उपासनाने तमन्नाचा एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत याबाबत माहिती दिली. 




‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट सुरेन्द्र रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि चिरंजीवीचा मुलगा राम चरण याने प्रोड्यूस केला आहे. तमन्नाने यात लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत चिरंजीवी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यात भूमिकेत आहेत. 




  सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची संपूर्ण कथा १८४७ रोजी ईस्ट इंडिया कंपनी विरोधात लढलेल्या नरसिम्हा रेड्डी व त्यांच्या साथीदारांवर आधारित आहे.



 

Web Title: ram charan wife gifted world 5th biggest diamond worth rs 2 crore to tamannaah bhatia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.