दुबईत मोठ्या थाटात पार पडलं राम चरणची पत्नी उपासनाचे डोहाळे जेवण, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 18:41 IST2023-04-05T18:41:15+5:302023-04-05T18:41:53+5:30
सोशल मीडियावर राम चरणची पत्नी उपासनाच्या डोहाळे जेवणाचा फोटो तुफान व्हायरल होतायेत.

दुबईत मोठ्या थाटात पार पडलं राम चरणची पत्नी उपासनाचे डोहाळे जेवण, फोटो झाले व्हायरल
साऊथचे सुपरस्टार राम चरण आणि उपासना कामिनेनी(Upasana Kamineni) त्यांच्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या महिन्यात, या जोडप्याने ऑस्करसाठी यूएसमध्ये दीर्घकाळ मुक्काम केला होता. यानंतर ते दुबईला गेले आहेत, जिथे उपासनाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. उपासनाने तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत.
बेबी शॉवरची थीम तिची बहीण अनुष्पला कामिनेनी आणि सिंदूरी रेड्डीने डिझाईन केली होती. उपासनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती ड्रीमी बेअर आणि मोठ्या केकसोबत दिसत आहे. उपासनाचा हा खास कार्यक्रम दुबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पांढऱ्या रंगाच्या थीममध्ये सजवण्यात आला होता, जिथे भरपूर हिरवळ आणि फुले दिसतात. निसर्गाच्या सान्निध्यात बेबी शॉवर साजरा करण्यात आला आणि स्टार पत्नीसह सर्वजण ग्लॅमरस दिसत होते.
सेलिब्रेशनच्या दरम्यान, राम आणि उपासनाने काही रोमँटिक फोटोसाठी पोज दिली. १४ जुन २०१२ साली रामचरण आणि उपासना लग्नबंधनात अडकले. हैदराबाद येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अनेक राजकीय आणि साऊथ, बॉलिवुड कलाकारांनी लग्नात हजेरी लावली. लग्नाच्या १० वर्षांनंतर दोघांच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे हे वर्ष नक्कीच रामचरणसाठी खास असणार आहे.