कसं फसवलं!! हिरा नव्हे तर बाटली ओपनर; तमन्नाच्या महागड्या डायमंडचं सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 08:00 AM2023-07-26T08:00:00+5:302023-07-26T08:00:00+5:30

Tamannaah Bhatia: तमन्नाच्या हिऱ्याच्या अंगठीविषयीचं सत्य समोर आलं आहे.

ram-charan-wife-upasana-kamineni-gave-tamannaah-bhatia-the-world-fifth-largest-diamond The truth came out | कसं फसवलं!! हिरा नव्हे तर बाटली ओपनर; तमन्नाच्या महागड्या डायमंडचं सत्य आलं समोर

कसं फसवलं!! हिरा नव्हे तर बाटली ओपनर; तमन्नाच्या महागड्या डायमंडचं सत्य आलं समोर

googlenewsNext

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) . केवळ साऊथच नव्हे तर तमन्नाने बॉलिवूडवरही राज्य गाजवलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आज तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अलिकडेच तमन्ना 'लस्ट स्टोरीज २' मध्ये झळकली. या सिनेमात तिने दिलेल्या किसिंग सीनची जोरदार चर्चा रंगली होती. ही चर्चा थांबत नाही. तर, यामध्येच तिच्या महागड्या हिऱ्याच्या अंगठीची चर्चा रंगली आहे.  परंतु, या हिऱ्याविषयी मोठं सत्य तिने सांगितलं आहे.

तमन्नाने अलिकडेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने तिच्या हातातील डायमंड रिंग फ्लॉन्ट केली होती. विशेष म्हणजे तिची ही रिंग पाहिल्यानंतर तिच्याकडे असलेला डायमंड हा जगातील सर्वात मोठा हिरा असल्याचं म्हटलं जात होतं. इतकच नाही तर हा हिरा तिला राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला हिने दिल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, हा खराखुरा हिरा नसून ते एक बाटली ओपनर असल्याचं समोर आलं आहे.

या हिऱ्याविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्यानंतर तमन्नाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला. सोबतच हा हिरा नसून ते एक बाटली ओपनर असल्याचं स्पष्ट केलं आहे. " आम्ही बॉटल ओपनरसह फोटोशूट करत होतो  वास्तविक हा हिरा नाही" #girlsliketoclickpics", असं कॅप्शन देत तमन्नाने निर्माण झालेला गैरसमज दूर केला आहे.

दरम्यान, सध्या तमन्ना तिच्या आगामी जेलर या सिनेमातील कावला या गाण्यामुळे चर्चेत येत आहे. 'जेलर' व्यतिरिक्त ती तेलुगुमध्ये 'भोला शंकर', मल्याळममध्ये 'बांद्रा' आणि तमिळमध्ये 'अरनमनाई 4' या सिनेमात झळकणार आहे.
 

Web Title: ram-charan-wife-upasana-kamineni-gave-tamannaah-bhatia-the-world-fifth-largest-diamond The truth came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.