लग्नाच्या 10 वर्षानंतरही रामचरणची पत्नी उपासनाचा आई होण्यास नकार, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 05:24 PM2022-07-10T17:24:25+5:302022-07-10T17:27:09+5:30

Ram Charan Wife Upasana Kamineni: तूर्तास चर्चा रामचरणची नाही तर त्याची पत्नी उपासना कामिनेनीची आहे. होय, एका इव्हेंटमधील वक्तव्यामुळे उपासना चर्चेत आली आहे.

ram charan wife upasana kamineni not having kids reason shock you | लग्नाच्या 10 वर्षानंतरही रामचरणची पत्नी उपासनाचा आई होण्यास नकार, हे आहे कारण

लग्नाच्या 10 वर्षानंतरही रामचरणची पत्नी उपासनाचा आई होण्यास नकार, हे आहे कारण

googlenewsNext

 Ram Charan wife Upasana Kamineni : साऊथ सुपरस्टार राम चरण ( Ram Charan) याचे जगभर चाहते आहेत. रामचरणच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ या सिनेमानं  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पण तूर्तास चर्चा रामचरणची नाही तर त्याची पत्नी उपासना कामिनेनीची (Upasana Kamineni) आहे. होय, एका इव्हेंटमधील वक्तव्यामुळे उपासना चर्चेत आली आहे. लग्नाच्या 10 वर्षानंतरही रामचरण व उपासना यांना मूल नाही. याचं कारण म्हणजे, लग्नाच्या 10 वर्षानंतरही उपासनाला ते नकोय.  

17 व्या एटीए संमेलनात सद्गुरूंसोबतच्या उपासनाच्या एका संभाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.  यावेळी उपासना मुलांबद्दल बोलली. उपासना व रामचरण लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. रामचरण मोठा सुपरस्टार आहे आणि उपासना मोठी बिझनेसवुमन आहे. दोघांकडेही पैशाची कमी नाही. परंतु दोघांना अद्याप मूल नाही. याचं कारण म्हणजे, उपासनाला आत्ता मूल नको आहे.

काय म्हणाली उपासना?
मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि माझं माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. पण लग्नाच्या 10 वर्षानंतरही मला मूल नको आहे. कारण मला लोकसंख्या वाढ  नकोय. वाढत्या लोकसंख्येमुळे मला मूल नको आहे. मी माझ्या खासगी आयुष्यात एखादा निर्णय घेतला असेल तर सर्वांनी त्याचा आदर करायला हवा, असंही ती म्हणाली.
उपासनाच्या या निर्णयाचं सद्गुरूंनी कौतुक केलं. ‘पुरुष नेहमीच त्याच्या पुढील पिढीसाठी चिंतेत असतो. पण जर पुढच्या पिढ्यांना येण्यापासून रोखलं गेलं तर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंची चिंता करण्याची गरज नाही. त्या महिलांना पाहून आनंद होतो ज्या मुलांना जन्म देऊ इच्छित नाही,’ असं सद्गुरू म्हणाले.

रामचरणची पत्नी उपासना एक बिझनेसवुमन आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. लाखो तरूणींच्या मनावर राज्य करणारा राम चरण कॉलेजमध्ये असताना एका मुलीच्या प्रेमात पडला. ती म्हणजे उपासना. राम चरण आणि उपासना यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं होतं. हळूहळू त्याचं प्रेमात रुपांतर झालं. राम चरण परदेशात गेल्यानंतर त्यांना एकमेकांपासून लांब राहणं कठीण झालं होतं.  त्यानंतर त्यांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. 12 जून 2012मध्ये त्यांनी लग्न केलं.

Web Title: ram charan wife upasana kamineni not having kids reason shock you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.