राम गोपाल वर्मांचं डिलीट ट्विट झाले व्हायरल, कंगना राणौतला म्हटले होते न्यूक्लियर बॉम्ब
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 03:02 PM2021-02-18T15:02:54+5:302021-02-18T15:35:17+5:30
Ram Gopal Varma tweets about Kangana Ranaut; deletes later :या ट्विटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी कंगनाचा न्यूक्लियर बॉम्ब असे उल्लेख केला होता.
कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर तिच्या आगामी सिनेमा 'धकड'शी संबंधित अपटेस् शेअर करत असते. कंगनाने नुकताच सिनेमाशी संबंधित एक पोस्ट केली होती. ज्यात तिचा क्लोजअप फोटो होता. या फोटोला घेऊन चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी एक पोस्ट केली होती. आता हे ट्विट कुठे दिसत नाही आहे.
You may think it’s strange to find solace in conflict,you may think it’s not possible to fall in love with the sound of the clash of swords,for you BATTLEFIELD might just be ugly reality but for the one who is born to FIGHT there is no other place in this world where she belongs. pic.twitter.com/FLToSOqUN9
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 16, 2021
राम गोपाल वर्मांनी केलं कौतुक
या ट्विटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी कंगनाला अणुबॉम्ब म्हटले होते. राम गोपाल वर्मा यांनी कंगनाच्या फोटोचे कौतुक केलं होतं. त्यांनी लिहिले की, चित्रपटचा निर्माता म्हणून कारकीर्दीत, एखाद्या कलाकाराचे ऐवढं चांगलं क्लोजअप पाहिले नाही. त्यांनी लिहिले होते की, कोणत्याही कलाकारमध्ये इतकी ओरिजिनॅलिटी आणि इंटेंसिटी पाहिली नाही. मात्र राम गोपाल वर्मांचं हे ट्विट आता डिलीट झाले आहे पण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
कंगना राणौत 'धाकड'मध्ये एका गुप्तहेर महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. 'धाकड'मधील एकूण अॅक्शन सिक्वेन्ससाठी तब्बल २५ कोटी रुपये खर्च झाल्याचे तिने सांगितले.'धाकड'साठी विश्वविख्यात फोटोग्राफी डायरेक्टर तेत्सुओ नगाता हे फोटोग्राफी डायरेक्शन करत आहेत. नगाता मूळचे जपानी पण फ्रेंच डायरेक्टर आहेत. त्यांनी जेवढे ऍवॉर्ड मिळवले आहेत. त्यावरून त्यांच्या आंतरराष्ट्रीय किर्तीला साजेसे बजेट ठेवणे क्रमप्राप्त असल्यानेच 'धाकड'च्या निर्मात्यांनी खर्चाची तयारी ठेवली आहे. '