ऑल द बेस्ट ‘सरकार’...! राम गोपाल वर्मा यांचा अॅक्टिंग डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 02:20 PM2019-04-08T14:20:57+5:302019-04-08T14:22:29+5:30
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे चित्रपटही वाद ओढवून घेतात. पण यावेळी बातमी जरा वेगळी आहे. होय, दिग्दर्शक म्हणून अनेक हिट चित्रपट देणारे राम गोपाल वर्मा आता अभिनयाच्या क्षेत्रात हात आजमावणार आहेत.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे चित्रपटही वाद ओढवून घेतात. पण यावेळी बातमी जरा वेगळी आहे. होय, दिग्दर्शक म्हणून अनेक हिट चित्रपट देणारे राम गोपाल वर्मा आता अभिनयाच्या क्षेत्रात हात आजमावणार आहेत. ७ एप्रिलला वाढदिवसाच्या दिवशी राम गोपाल यांनी आपल्या अॅक्टिंग डेब्यूची घोषणा केली. ‘वाढदिवसाच्या दिवशी माझा अॅक्टिंग डेब्यू होतोय. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मिळाल्यास मला आनंद होईल,’ असे राम गोपाल यांनी लिहिले.
‘कोबरा’ या तेलगू चित्रपटातून राम गोपाल वर्मा यांचा अॅक्टिंग डेब्यू होणार आहे. या चित्रपटात ते एका सीबीआय अधिका-याच्या भूमिकेत दिसतील.
Ahem ! On the occasion of my birthday today ,i am debuting as an actor for the first time in my career ..I wouldn’t mind if u don’t bless me ..Thanks 😍💐🍾 pic.twitter.com/P5qhKFsdOx
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 7, 2019
दरम्यान राम गोपाल वर्मांच्या या नव्या इनिंगसाठी बॉलिवूडमधील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राम गोपाल यांच्या ‘सरकार’ या चित्रपटात लीड भूमिका साकारणारे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे नावही शुभेच्छा देणा-यांमध्ये आहे. ‘अखेर, राम गोपाल वर्मा अभिनयात येत आहेत. ऑल द बेस्ट सरकार...ऊफ, एक और कॉम्पिटिशन...,’ असे ट्वीट बच्चन यांनी केले.
T 3136 - FINALLY .. !! Ram Gopal Varma .. the 'SARKAR' finds his true vocation .. ACTING !! All the best Sircaarrrrr .. 👍👍👍
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 8, 2019
DAMN .. another competition !!😟😟 pic.twitter.com/5sFDCB8NnD
राम गोपाल वर्मा यांनी सन १९८९ मध्ये नागार्जुन स्टारर ‘शिवा’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये सत्या, कंपनी, सरकार यासारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले आहेत. आता राम गोपाल वर्मा अभिनय करताना दिसणार आहेत. त्यांचा पडद्यावरचा अभिनय प्रेक्षकांना किती भावतो, ते बघूच.