या तारखेला छोट्या पडद्यावर राम गोपाल वर्माच्या ‘अबतक छप्पन’ सिनेमाचे होणार प्रसारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 10:56 AM2018-05-14T10:56:07+5:302018-05-14T16:26:07+5:30

घातक गुंडांना तुरुंगात कैद करण्याऐवजी त्यांना एन्काऊन्टरमध्ये मारून टाकण्याबद्दल प्रमाणिक पोलिस अधिकारी साधू आगाशे प्रसिध्द असतो. मुंबई पोलिसांच्या गुन्हा ...

Ram Gopal Varma's 'Abtak Chappan' will be screened on a small screen on this date | या तारखेला छोट्या पडद्यावर राम गोपाल वर्माच्या ‘अबतक छप्पन’ सिनेमाचे होणार प्रसारण

या तारखेला छोट्या पडद्यावर राम गोपाल वर्माच्या ‘अबतक छप्पन’ सिनेमाचे होणार प्रसारण

googlenewsNext
तक गुंडांना तुरुंगात कैद करण्याऐवजी त्यांना एन्काऊन्टरमध्ये मारून टाकण्याबद्दल प्रमाणिक पोलिस अधिकारी साधू आगाशे प्रसिध्द असतो. मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेतील हा अधिकारी हे एन्काऊन्टर कसे रचायचा त्याची कार्यपध्दत दाखवून त्याचेही काही माफिया डॉनबरोबर गुप्त संबंध होते, हे दाखविण्यात आले आहे. नाना पाटेकर, मोहन आगाशे, रेवती, यशपाल शर्मा, कुणाल विजयकर यासारखे दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘अबतक छप्पन’ या चित्रपटाची निर्मिती राम गोपाल वर्माने केली आहे.आपल्या ‘वो जमाना, करें दीवाना’ या ध्येयधोरणानुसार ‘झी क्लासिक’ वाहिनी येत्या शुक्रवारी, 18 मे रोजी रात्री 10.00 वाजता ‘इंडियाज फायनेस्ट फिल्म्स’ मालिकेअंतर्गत या चित्रपटाचे प्रसारण करणार आहे.

चित्रपटाची कथा मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रकाश टाकते. शहरातील संघटित गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी या शाखेचे अधिकारी साधू आगाशे (नाना पाटेकर) याच्या नेतृत्त्वाखाली एन्काऊन्टर पथक तयार करतात आणि संघटित गुन्हेगारीला नियंत्रणात आणतात. आपल्या या मोहिमेचा एक भाग म्हणून साधू परदेशात दडून बसलेला एक माफिया डॉन जमीर (प्रसाद पुरंदरे) याच्याशी संबंध प्रस्थापित करतो. दुसरीकडे या शाखेचे प्रमुखपद मिळविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत स्पर्धा-असूया असते. इम्तियाझ सिद्दिकी (यशपाल शर्मा) याला साधूचे पद हवे असते. पोलिस आयुक्तपदी सूचक (जीवा) यांची नियुक्ती झाल्यावर या अधिकाऱ्यांमधील समीकरणे बदलतात आणि साधूला डावलून सूचक हे इम्तियाझला त्याच्या जागी बसवितात.या अंतर्गत राजकारणात साधूचा निभाव लागेल काय? इम्तियाझ त्याला पकडण्याआधी साधू त्याच्या तावडीतून सुटेल काय? या सगळ्या गोष्टीं रसिकांना घरबसल्या अनुभवता येणार आहे.

Web Title: Ram Gopal Varma's 'Abtak Chappan' will be screened on a small screen on this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.