उर्मिला मातोंडकरसह अफेअर असल्याचे कळताच रामगोपाल वर्माच्या पत्नीने लगावली होती तिच्या कानशिलात, वाचा त्यांनतर काय घडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 12:33 IST2021-04-07T12:28:14+5:302021-04-07T12:33:44+5:30
Ram Gopal Varma, Urmila Matondkar lovestoey :उर्मिलाला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली ती राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला' या सिनेमाने. करिअरसाठी हा सिनेमा टर्निंग पॉईंट ठरला.

उर्मिला मातोंडकरसह अफेअर असल्याचे कळताच रामगोपाल वर्माच्या पत्नीने लगावली होती तिच्या कानशिलात, वाचा त्यांनतर काय घडले
आधी मासूम बनून ती रसिकांसमोर आली त्यानंतर रंगीला गर्ल बनून तिनं अनेकांना घायाळ केलं. छम्मा छम्माच्या तालावर तिनं अनेकांना थिरकवलं तर सत्यासारख्या सिनेमातून अभिनयाची वेगळी छाप पाडली. अशी हिंदी सिनेमात नाव कमावलेली म-हाठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर.
उर्मिला मातोंडकरने 90च्या दशकात अनेक मोठे निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसोबत काम केले होते. यशोशिखरावर असताना उर्मिलाच्या आयुष्यात एका व्यक्तीची एंट्री झाली.ती व्यक्ती होती रामगोपाल वर्मा.उर्मिलाला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली ती राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला' या सिनेमाने. करिअरसाठी हा सिनेमा टर्निंग पॉईंट ठरला.
सिनेमात काम करता करता दोघांमध्ये जवळीक वाढू लागली होती. त्यांनतर राम गोपाल वर्मांचे उर्मिलासह अफेयर खूप गाजले. उर्मिलाच्या प्रेमात पडण्याआधी राम विवाहित होते. जेव्हा पत्नीला या अफेअरची भनक लागली तेव्हा मात्र त्यांची अशी काही सटकली की रागाच्या भरात राम गोपाल वर्माची पत्नी रत्ना यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या कानाखाली लागल्याचेही वृत्त समोर आले होते. या अफेअरनंतर रत्ना यांनी रामगोपाल वर्मापासून घटस्फोट घेतला.