राम गोपाल वर्माला होऊ शकते अटक; पण का? जाणून घ्या संपूर्ण बातमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 04:47 PM2018-02-22T16:47:11+5:302018-02-22T22:17:23+5:30
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवºयात सापडताना बघावयास मिळत आहेत. होय, रामूवर हॉटेलमध्ये पोर्न चित्रपट शूट केल्याचा आरोप ...
द ग्दर्शक रामगोपाल वर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवºयात सापडताना बघावयास मिळत आहेत. होय, रामूवर हॉटेलमध्ये पोर्न चित्रपट शूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या आगामी ‘गॉड, सेक्स अॅण्ड ट्रुथ’ या चित्रपटात अमेरिकी पोर्न स्टार मिया मालकोवा मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात तिने प्रचंड बोल्ड सीन्स दिले आहेत. ज्यावर महिला संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. हैदराबादमध्ये तर अश्लीलता आणि महिलांचा अपमान केल्याप्रकरणी रामूवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, ‘जर ग्रेट आंध्राची बातमी खरी ठरल्यास राम गोपाल वर्मावर जेलची हवा खाण्याची वेळ उद्भवू शकते. एका समाजसेवीने कथितरीत्या दावा केला की, आमच्याकडे एक भक्कम पुरावा असून, त्यानुसार रामूने त्याच्या या चित्रपटाची शूटिंग हैदराबादमध्येच केली आहे, युरोपमध्ये नाही. मात्र रामूने हे आरोप फेटाळून लावताना आपण चित्रपटाची शूटिंग युरोपमध्येच केल्याचे ठामपणे सांगितले आहे.
असे म्हटले जात आहे की, या समाजसेविकेकडे असे काही फोटो आहेत, ज्यावरून हे स्पष्ट होऊ शकते की, पोर्न स्टार मिया मालकोवा चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात आली होती. याशिवाय सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये रामूचे काही टॉलिवूडमधील मित्रही बघावयास मिळत आहेत. भारतात अश्लील चित्रपटाची शूटिंग करणे गुन्हा आहे. त्यामुळे रामूने भारतातच या चित्रपटाची शूटिंग केल्याचे निष्पन्न झाल्यास रामूसह त्या हॉटेलच्या स्टाफलाही याप्रकरणी दोषी ठरविले जाऊ शकते.
दरम्यान, याप्रकरणी दिग्दर्शक राम गोपाल वर्माने एक ट्विट केले आहे. त्यामध्ये लिहिले की, ‘लोक माझ्याबद्दल अपमानजनक बोलून मला दोष देत आहेत. मला वेडा, सायको आणि दहशतवादी संबोधत आहेत. हे लोक म्हणत आहेत की, मला गोळी मारून ठार करायला पाहिजे. असो, माझ्या वकिलांनी कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची व्ह्यूरचना आखली आहे. त्यामुळे पुढच्या काळात मी याविषयी काहीही बोलणार नाही.’

}}}} ">For all those false news circulating that I have denied making #GodSexTruth,its only a production and technical process that I was detailing ..How can I deny when I am credited in the film? https://t.co/eJrULnCBUJ— Ram Gopal Varma (@RGVzoomin) February 19, 2018
For all those false news circulating that I have denied making #GodSexTruth,its only a production and technical process that I was detailing ..How can I deny when I am credited in the film? https://t.co/eJrULnCBUJ— Ram Gopal Varma (@RGVzoomin) February 19, 2018