​राम गोपाल वर्मांच्या ‘या’ tweetsने येऊ शकतो राजकीय ‘भूकंप’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2017 07:23 AM2017-03-12T07:23:13+5:302017-03-12T12:59:11+5:30

जागतिक महिला दिनी एकापाठोपाठ एक असे अनेक आक्षेपार्ह tweets करून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी खळबळ उडवून दिली. प्रत्येक ...

Ram Gopal Verma's 'these' tweets can come from a 'earthquake' !! | ​राम गोपाल वर्मांच्या ‘या’ tweetsने येऊ शकतो राजकीय ‘भूकंप’!!

​राम गोपाल वर्मांच्या ‘या’ tweetsने येऊ शकतो राजकीय ‘भूकंप’!!

googlenewsNext
गतिक महिला दिनी एकापाठोपाठ एक असे अनेक आक्षेपार्ह tweets करून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी खळबळ उडवून दिली. प्रत्येक महिलेने सनी लिओनीप्रमाणे पुरुषांना आनंद द्यायला हवा, असे वादग्रस्त tweet रामूने केले होते. त्यांच्या या tweet ने चांगलेच रान माजले. सर्व स्तरातून त्यांच्या या tweetsचा निषेध झाला.  केवळ इतकेच नाही तर याप्रकरणी त्यांच्याविरोधात दोन गुन्हेही नोंदवले गेले.  अर्थात यामुळे राम गोपाल वर्मांना सुबुद्धी आली,असे म्हणता येणार नाही. कारण असे असते तर टिवटिवाट करताना त्यांनी तो विचारपूर्वक केला असता. होय, रामूंनी केलेले ताजे tweet पाहता, असेच वाटते आहे. त्यांच्या या tweetsमुळे राजकीय क्षेत्रात ‘भूकंप’ येण्याची शक्यता आहे.

राम गोपाल वर्मा यांनी आपल्या tweet मध्ये अमिताभ बच्चन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सामील केले आहे. ‘नरेंद्र मोदींच्या सरकारपेक्षा मला अमिताभ बच्चन यांचे ‘सरकार’ चांगले वाटते. पण होऊ घातलेल्या राम मंदिरामुळे मला नरेंद्र मोदींची सरकारगिरी आवडू लागली आहे’, असे एक tweet त्यांनी केले आहे. राम गोपाल इथेच थांबले नाहीत. अन्य एका tweetमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांना भगवान रामचंद्रांपेक्षा मोठा परमेश्वर सांगत, त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘मला नरेद्र मोदी भगवान रामचंद्रांपेक्षाही मोठे परमेश्वर वाटतात. कारण मी राम युगात नव्हतो. पण नरेंद्र मोदींच्या अयोध्येत जरूर राहतोयं,’ असे त्यांनी म्हटले आहे. आता राम गोपाल यांच्या या tweetsवर काय प्रतिक्रिया उमटतात, ते बघूच...
 

Web Title: Ram Gopal Verma's 'these' tweets can come from a 'earthquake' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.