'या' अभिनेत्याची अक्षय कुमार-अर्शद वारसीच्या 'जॉली एलएलबी ३' मध्ये एन्ट्री! भूमिकेबद्दल म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 09:47 IST2025-02-01T09:46:37+5:302025-02-01T09:47:06+5:30

भूमिका छोटी आहे पण... राम कपूरने दिली माहिती

Ram Kapoor s entry in Akshay Kumar Arshad Warsi s Jolly LLB 3 movie he is also going to play advocate | 'या' अभिनेत्याची अक्षय कुमार-अर्शद वारसीच्या 'जॉली एलएलबी ३' मध्ये एन्ट्री! भूमिकेबद्दल म्हणाला...

'या' अभिनेत्याची अक्षय कुमार-अर्शद वारसीच्या 'जॉली एलएलबी ३' मध्ये एन्ट्री! भूमिकेबद्दल म्हणाला...

अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) टेलिव्हिजनविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. अनेका मालिकांमधून त्याने अभिनयाची छाप पाडली आहे. 'बडे अच्छे लगते है' ही त्याची सर्वात गाजलेली मालिका. शिवाय राम कपूरने काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. रामची आता जॉली एलएलबी ३ मध्येही एन्ट्री झाली आहे.  नुकतंच एका पॉडकास्टमध्ये त्याने हा खुलासा केला.

राम कपूरने सायरस ब्रोचा पॉडकास्टवर हजेरी लावली होती. यावेळी त्याने आगामी प्रोजेक्ट्सबद्दल अपडेट दिले. यावेळी तो म्हणाला, "जॉली एलएलबी कमाल सिनेमा आहे. मी याच्या तिसऱ्या पार्ट मध्ये अक्षय आणि अर्शद वारसीप्रमाणेच वकिलाची भूमिका साकारणार आहे. माझी भूमिका तशी छोटी आहे पण परिणामकारक आहे. मी या सिनेमाचा भाग आहे याचाच मला आनंद आहे."

तो पुढे म्हणाला, "याशिवाय मी आयुष्मान खुरानासोबतही काम करत आहे. सिनेमाचं थोडं शूट झालं आहे तर बाकीचं काश्मिरमध्ये होणार आहे. यासाठी लवकरच आम्ही काश्मिरला जाऊ. तसंच एक वेब ड्रामाही रिलीज होणार आहे. मी सर्व प्रोजेक्ट्ससाठी खूप उत्सुक आहे."

'जॉली एलएलबी ३' यावर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होण्याची शक्यता आहे. सिनेमाच्या पहिले दोन्ही भाग प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले होते. आता सर्वांनाच तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. राम कपूर सध्या त्याच्या वेटलॉसमुळेही चर्चेत आहे. त्याला नेहमीच सर्वांनी वजनदार पाहिलं होतं. पण आता त्याने दीड  वर्षात तब्बल ५५ किलो वजन कमी केलं आहे. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

Web Title: Ram Kapoor s entry in Akshay Kumar Arshad Warsi s Jolly LLB 3 movie he is also going to play advocate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.