रामभक्तीने भावुक अन् चेहऱ्यावर आनंद! अयोध्यानगरीतून सेलिब्रिटींचा सेल्फी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:33 IST2024-01-22T14:32:46+5:302024-01-22T14:33:43+5:30
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, या फोटोंमधील सेलिब्रिटींच्या एका फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रामभक्तीने भावुक अन् चेहऱ्यावर आनंद! अयोध्यानगरीतून सेलिब्रिटींचा सेल्फी समोर
आज संपूर्ण देश रामभक्तीत तल्लीन झाला आहे. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. विविध क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रामललाचं रुप पाहून देशवासी भरुन पावले आहेत. पण, या फोटोंमधील सेलिब्रिटींच्या एका फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजली होती. रामललाच्या आगमनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी पारंपरिक वेशात गेले होते. अयोध्यानगरीतून सेलिब्रिटींचा एक सेल्फी समोर आला आहे. सेलिब्रिटींच्या या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये माधुरी दीक्षित, आयुषमान खुराना, डॉ.नेने सेल्फी घेताना दिसत आहेत. तर कतरिना कैफ, विकी कौशल, आलिया भट, रणबीर कपूर यांच्यासह दिग्दर्शक रोहित शेट्टीने फोटोसाठी पोझ दिल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये कलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.
Several Bollywood celebrities attended the Ayodhya Ram Temple Pranpratishtha ceremony today.
— ANI (@ANI) January 22, 2024
Directors Rohit Shetty & Rajkumar Hirani, actors Madhuri Dixit Nene, Alia Bhatt-Ranbir Kapoor, Katrina Kaif-Vicky Kaushal and Ayushmann Khurrana pose for a photograph at the venue. pic.twitter.com/ufZbtmj4f9
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अयोध्येत होणाऱ्या या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची लगबग सुरू होती. बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच मुकेश अंबानी, नीता अंबानी यांनीही हजेरी लावली होती. तर क्रिकेटविश्वातील खेळाडूही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्यानगरीत दाखल झाले होते. आता २३ जानेवारीपासून राम मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे.