Monday Box Office: ‘कांतारा’चा धमाका! अक्षयचा ‘रामसेतू’ व अजयचा ‘थँक गॉड’चा खेळ खल्लास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 03:03 PM2022-11-01T15:03:45+5:302022-11-01T15:05:03+5:30

Ram Setu, Thank God, Kantara Box Office Collection Day 7 : ‘मंडे टेस्ट’मध्ये ‘रामसेतू’ व  ‘थँक गॉड’ फेल, ‘कांतारा’ची दुप्पट कमाई

Ram Setu Thank God Box Office Collection Day 7 Falls Flat Kantara Emerges With Strong Hold On Monday | Monday Box Office: ‘कांतारा’चा धमाका! अक्षयचा ‘रामसेतू’ व अजयचा ‘थँक गॉड’चा खेळ खल्लास!!

Monday Box Office: ‘कांतारा’चा धमाका! अक्षयचा ‘रामसेतू’ व अजयचा ‘थँक गॉड’चा खेळ खल्लास!!

googlenewsNext

Ram Setu, Thank God, Kantara Box Office Collection Day 7 : 25 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’ या चित्रपटाने पहिल्या सोमवारच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. एका आठवड्यातच अक्कीचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फुस्स झाला आहे. यावर्षी एकापाठोपाठ एक तीन फ्लाूप देणाऱ्या अक्षयसाठी ‘रामसेतू’ची ओपनिंग थोडी दिलासादायक होती. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 15 कोटींचा बिझनेस केला. पण आता आठवडाभराचा बिझनेस बघता, मेकर्सची चिंता वाढली आहे. अक्षयच्याच ‘रामसेतू’बरोबर रिलीज झालेल्या अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाची अवस्था तर त्याहूनही वाईट आहे. याऊलट ‘कांतारा’चं हिंदी व्हर्जनने मंडे टेस्ट चांगल्या गुणांची पास करत धमाका केला आहे.

‘रामसेतू’ची हवा टाईट
अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’ने शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी चांगली कमाई केली होती. त्यामुळे रविवारी कमाईत वाढ होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण ‘रामसेतू’ने रविवारी फक्त 7.25 कोटींचा बिझनेस केला. सोमवारी रिलीजच्या 7 व्या दिवशी या चिद्धपटाच्या कमाईत 60 टक्के घट दिसली. रिलीजच्या पहिल्या सोमवारी चित्रपटाने केवळ 2.60 कोटींचा गल्ला जमवला. मंगळवारचे आकडे यापेक्षाही निराशाजनक असतील, असं मानलं जात आहे. एका आठवड्यात ‘रामसेतू’ने सुमारे 58.25 कोटींचा बिझनेस केला आहे.

अजयचा ‘थँक गॉड’ फ्लॉप
अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’ हा सिनेमा फ्लॉपच्या यादीत गेल्यात जमा आहे. सोमवारी या चित्रपटाने केवळ 1.50 कोटींचा बिझनेस केला. गेल्या 7 दिवसांत या चित्रपटाने केवळ 31 कोटींचा बिझनेस केला आहे.

‘कांतारा’ सूसाट
कन्नडमधून हिंदीत डब करण्यात आलेला ‘कांतारा’ गेल्या 14 ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला होता. सोमवारी ‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनचा 18 वा दिवस होता. पण 18 व्या दिवशी या चित्रपटाने 4.50 कोटी कमावले. हा आकडा रामसेतूच्या सोमवारच्या कलेक्शनपेक्षा दुप्पट आहे. 18 दिवसांत ‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनने 43 कोटींचा बिझनेस केला आहे. रिपोर्टनुसार, ‘कांतारा’चे हिंदी शो वाढवण्यात आले आहेत. याऊलट रामसेतूचे शो रद्द करण्यात येत आहेत.

Web Title: Ram Setu Thank God Box Office Collection Day 7 Falls Flat Kantara Emerges With Strong Hold On Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.