Ram Setu Trailer Out: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा रोमांचकारी ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 01:09 PM2022-10-11T13:09:48+5:302022-10-11T13:32:30+5:30

Ram Setu Trailer: ‘राम सेतू’ हा अक्षयचा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. त्याआधी ‘राम सेतू’चा अ‍ॅक्शनने भरलेला ट्रेलर रिलीज झाला आहे...

Ram Setu trailer out Akshay Kumar Jacqueline Fernandez Nushratt Bharuchha | Ram Setu Trailer Out: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा रोमांचकारी ट्रेलर आऊट

Ram Setu Trailer Out: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा रोमांचकारी ट्रेलर आऊट

googlenewsNext

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’ (Ram Setu) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर टीझरपेक्षा चांगला आणि थरारक आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत. 'राम सेतू'ची कथा नास्तिक पुरातत्व शास्त्रज्ञाची  आर्यन कुलश्रेष्ठ म्हणजेच अक्षय कुमार याच्याभोवती फिरते. पौराणिक राम सेतूचे खरे अस्तित्व सिद्ध करण्याचे काम आर्यनला मिळते. यानंतर, आर्यन 'राम सेतू' च्या पौराणिक कथा आणि विज्ञानाच्या तंत्राने त्याचे सत्य शोधणे सुरू होते.

कसा आहे ट्रेलर?
आर्यन राम सेतूचं सत्य आणि कल्पनेमध्ये मंथन करताना दिसतो. दरम्यान, त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तो विज्ञानाच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न करतो. ट्रेलरमध्ये राम सेतूशी संबंधित अनेक अॅक्शन सीन्स आणि रहस्ये पाहायला मिळतात. आर्यन ७ हजार जुना इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि राम सेतूजवळ पोहोचतो. यात त्याच्यासोबत जॅकलीनही आहे.  झी स्टुडिओच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 2 मिनिटे 9 सेकंदांच्या या चित्रपटाचा ट्रेलर रोमांचकारी आहे. कुमार हातात दगड घेऊन राम सेतूवर चालत असल्याचे दृश्यही खूप आकर्षक आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाचा ट्रेलर अ‍ॅक्शन, थ्रिलरने भरलेला आहे.

दरम्यान,राम सेतू हा चित्रपट एक अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर मुव्ही आहे.अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार हा सिनेमा अक्षयचा यावर्षातला पाचवा सिनेमा आहे.

Web Title: Ram Setu trailer out Akshay Kumar Jacqueline Fernandez Nushratt Bharuchha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.