कुठे आहे 'राम तेरी गंगा मैली'तील दिव्या राणा? नाव बदलून जगत आहे वेगळं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 09:24 AM2023-03-07T09:24:28+5:302023-03-07T09:29:24+5:30
राज कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली’ मध्ये राजीव कपूरच्या अपोझिट मंदाकिनीला कास्ट केलं तर दिव्या राणाला दुसरी महत्वाची भूमिका दिली.
राज कपूर यांनी त्यांचा लहान मुलगा राजीव कपूरला 1983 मध्ये ‘एक जान हैं हम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. या सिनेमातून एकटा राजीवच डेब्यू करत नव्हता. त्याच्यासोबतच दिव्या राणा या अभिनेत्रीनेही बॉलिवूडमध्ये पाउल ठेवलं होतं. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा आपटला होता. राज कपूर यांनी दिव्या राणाला आणखी एक संधी देत आपल्या ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये भूमिका दिली.
राज कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली’ मध्ये राजीव कपूरच्या अपोझिट मंदाकिनीला कास्ट केलं तर दिव्या राणाला दुसरी महत्वाची भूमिका दिली. 1985 मध्ये आलेला हा सिनेमा सुपरहिट ठरला. पण सिनेमाच्या यशाचं श्रेय मंदाकिनीला मिळालं. या सिनेमात दिव्या राणाकडे लोकांनी फार लक्षच दिलं नाही.
या सुपरहिट सिनेमानंतर दिव्या राणाला आणखी काही सिनेमे मिळाले. ती बॉलिवूडमध्ये साधारण 6 वर्ष अॅक्टिव होती. यादरम्यान तिने ‘मां कसम’, ‘परम धरम’, ‘अंधा युद्ध’, ‘गरीबों का दाता’, ‘वतन के रखवाले’ आण ‘हिम्मत और मेहनत’ सारख्या एकू 11 सिनेमात दिसली. पण यातील जास्त सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत. आता तिला फार कामही मिळत नव्हतं.
दिव्या राणा नंतर इंडस्ट्रीपासून दूर गेली. बऱ्याच वर्षांपासून ती लाइमलाईटपासून दूर आहे. राजीव कपूरच्या निधनानंतर तिचं नाव चर्चेत आलं होतं. पण तिने तिचं वेगळं विश्व तयार केलं आहे. दिव्या राणा आता सलमा मनेकिया झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिने मुंबईतील बिझनेसमन फजलसोबत लग्न केलं.
दिव्या राणाला कलेची फार आवड आहे. ती फोटोग्राफर आणि मूर्तिकार म्हणून फेमस आहे. तिला दोन मुलं आहेत. त्यांच्यासोबतच फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमध्ये ती आधीसारखीच सुंदर दिसत आहे. ती तिच्या संसारात आनंदी आहे.