'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:39 IST2025-04-21T13:37:14+5:302025-04-21T13:39:34+5:30
Actress Mandakini And Dawood Ibrahim : नव्वदच्या दशकात अभिनेत्री मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिमच्या अफेअरच्या बातम्या सर्वत्र होत्या. दोघांच्या फोटोंमुळे बराच गोंधळ उडाला. दरम्यान आता दाऊद आणि मंदाकिनी यांना एक मुलगा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या वृत्तामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
अभिनेत्री मंदाकिनी(Actress Mandakini)चं नाव घेतलं तर डोळ्यासमोर येतो तो तिचा लोकप्रिय चित्रपट 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili Movie) आणि तिचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim)सोबतचे नाते. १९९४ साली मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम एकत्र एका क्रिकेट सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये दिसले होते. तेव्हापासून त्यांचे अफेयर असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावेळीच्या फोटोंनी खळबळ उडवून दिली होती. पण कालांतराने, तोच दाऊद इब्राहिम मंदाकिनीच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण ठरलं. असे म्हटले जाते की दाऊद इब्राहिममुळे मंदाकिनीला चित्रपट मिळणे बंद झाले आणि तिच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. एका पुस्तकात असा दावाही करण्यात आला होता की, मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम यांना एक सीक्रेट मुलगा आहे, जो आता बंगळुरूमध्ये राहतो.
२०१५ साली दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरज वर्मा यांनी हा दावा केला होता. २०१३ मध्ये निवृत्त झालेले नीरज शर्मा यांनी दाऊद इब्राहिमवर डायल डी फॉर डॉन नावाचे पुस्तक लिहिले होते. यामध्ये त्यांनी मंदाकिनी आणि दाऊदला एक सीक्रेट मुलगा असल्याचा दावा केला होता. नीरज कुमार यांनी असा दावाही केला होता की, त्यांनी दाऊद इब्राहिमची तीनदा मुलाखत घेतली होती. पुस्तकात त्यांनी दाऊद इब्राहिमच्या एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या प्रेमसंबंधाचाही उल्लेख केला होता. असाही दावा करण्यात आला होता की त्यांच्या मुलाला अभिनेत्रीची बहीण बंगळुरूमध्ये सांभाळते आहे.
मंदाकिनीच्या कारकिर्दीवर झाला विपरीत परिणाम
खरेतर नीरज वर्मा यांनी त्यांच्या पुस्तकात कुठेही उल्लेख केलेला नाही की ती अभिनेत्री मंदाकिनी होती. पण हे मूल दाऊद इब्राहिम आणि १८ वर्षांच्या अभिनेत्रीचे आहे असा दावा निश्चितच करण्यात आला. दोघांनीही गुपचूप लग्न केले होते. १९९४ मध्ये मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिमचे फोटो व्हायरल झाल्यापासून त्यांच्या अफेअरच्या बातम्या वारंवार येत होत्या. असे म्हटले जाते की दाऊद मंदाकिनीवर इतका प्रेम करत होता की तो चित्रपट निर्मात्यांना तिला आपल्या चित्रपटांमध्ये नायिका म्हणून घेण्याची विनंती करत असे आणि धमक्या देत असे. पण यामुळे मंदाकिनीच्या कारकिर्दीवर विपरीत परिणाम होऊ लागला.
मंदाकिनीने नाकारलेले दाऊदसोबतचे नाते
खरंतर, १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिमचे नाव समोर आले होते. तो त्याचा मुख्य आरोपी होता, जो नंतर भारतातून पळून गेला. अशा परिस्थितीत, मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील जवळीकतेच्या बातम्यांनी जोर धरला होता. मात्र, मंदाकिनीने दाऊद इब्राहिमसोबत प्रेमसंबंध असल्याचे नाकारले होते. २०१० मध्ये 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा मंदाकिनीला दाऊद इब्राहिमसोबतच्या तिच्या नात्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली होती, लोकांनी माझे नाव दाऊदशी जोडावे किंवा त्याबद्दल विचार करावा असे मला वाटत नाही. ती आता भूतकाळातली गोष्ट आहे. त्या घटनेशी माझे नाव जोडून लोक अजूनही माझे नाव वापरत आहेत हे पाहून मला खूप वाईट वाटते.
अभिनेत्रीचे उद्धवस्त झाले करिअर
मंदाकिनीने दाऊद इब्राहिमशी जवळीक असल्याचे नाकारले होते, परंतु जेव्हा पोलिस मुंबई बॉम्बस्फोटांचा तपास करत होते, तेव्हा मंदाकिनीचीही चौकशी करण्यात आली. नंतर मंदाकिनीला या प्रकरणात क्लीन चिट मिळाली, पण तिचे करिअर उद्ध्वस्त झाले. मंदाकिनी आता अभिनयापासून दूर आहे, परंतु अलिकडेच ती काही रिएलिटी शोज आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली.