'राम तेरी गंगा मैली' फेम अभिनेत्री मंदाकिनीचा न पाहिलेला लग्नाचा फोटो आला समोर, पाहा कोण आहे तिचा नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 03:02 PM2024-04-18T15:02:57+5:302024-04-18T15:04:56+5:30
Mandakini : १९८५ मध्ये रिलीज झालेला सुपरहिट सिनेमा राम तेरी गंगा मैलीमध्ये झळकलेली मंदाकिनी उर्फ यास्मीनचा थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती फॅमिलीसोबत दिसते आहे.
१९८०च्या काळात आपल्या सेंसेशनल लूक्स आणि व्हाइट शिफॉन साडी परिधान करून झऱ्याच्या किनारी बसलेली 'राम तेरी गंगा मैली'(Ram Teri Ganga Maili)मधील अभिनेत्री मंदाकिनीने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मंदाकिनी(Mandakini)ने सुंदर डोळे आणि अभिनयाच्या जोरावर पहिल्याच चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य केले. त्याकाळी ग्लॅमरस आणि सेंसेशनल अभिनेत्रींमध्ये मंदाकिनीचं नाव घेतलं जायचं. याशिवाय ती कॉन्ट्रव्हर्सीमुळेही चर्चेत असायची. असे म्हटले जाते की, तिचे दाऊद इब्राहिमसोबत कनेक्शन होते. काही चित्रपटांनंतर तिने सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला होता. याचदरम्यान तिच्या आयुष्यात डॉ. कागयुर रिनपोचे टी टाकुर आले. त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि त्या दोघांनी लग्न केले.
वयाच्या २२व्या वर्षी राम तेरी गंगा मैलीमधून पदार्पण करणारी मंदाकिनी चित्रपटांपेक्षा लव्ह लाइफमुळे जास्त चर्चेत आली. तिचा दाऊद इब्राहिमसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर ती बॉलिवूडपासून दुरावली. मग १९९० साली डॉक्टर कागयुर टी रिनपोचे ठाकूर यांच्यासोबत लग्न केले. ७०-८०च्या काळात कागयुर मर्फी रेडिओच्या प्रिंट जाहिरातीत झळकले होते. त्यानंतर त्यांनी बौद्ध भिक्षा ग्रहण केली. लग्नानंतर मंदाकिनीला दोन मुलं झाली. मुलाचे नाव रब्बील आहे तर लेकीचं नाव आहे राब्जे. मंदाकिनी आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते आणि तिब्बती हर्बल सेंटरमध्ये तिब्बत योगदेखील शिकवते आहे.
दरम्यान आता इंस्टाग्रामवर status_queen59 नामक पेजवर अभिनेत्री मंदाकिनी उर्फ यास्मीन जोसेफचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यात त्यांच्या लग्नादरम्यानचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात तिने व्हाइट आणि रेड रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. याशिवाय यात तिचा आणि तिच्या पतीसोबतचे बरेच फोटो आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. मंदाकिनीने बॉलिवूडशिवाय तेलगू सिनेइंडस्ट्रीत सिंहासनम, विषकन्या आणि बंगालीत अंधा बिचार, लक्ष्मी के रुप में जैसी या चित्रपटात काम केले होते.