"४ वर्ष दिवाळी साजरी केली नव्हती.."; 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:32 PM2024-10-31T16:32:54+5:302024-10-31T16:33:18+5:30

'रामायण'च्या शूटिंगदरम्यान दीपिका चिखलीया यांनी दिवाळी का साजरी केली नाही? याचा खुलासा केला

ramayan fame Deepika Chikhalia during the shooting of Ramayan she did not celebrate diwali | "४ वर्ष दिवाळी साजरी केली नव्हती.."; 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा

"४ वर्ष दिवाळी साजरी केली नव्हती.."; 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा

'रामायण' मालिका कोणी बघितली नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी 'रामायण' मालिका आवडीने पाहिली आहे. इतकंच नव्हे जेव्हा लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा दाखवण्यात आली होती तेव्हा पुन्हा एकदा ही मालिका सर्वांनी पाहिली. या मालिकेत सीतेची भूमिका साकारली होती अभिनेत्री दीपिका चिखलीया यांनी. 'रामायण'च्या मालिकेदरम्यान दीपिका यांनी ४ वर्ष दिवाळी साजरी का केली नाही याचा आश्चर्यजनक खुलासा त्यांनी केलाय.  

म्हणून दीपिका यांनी ४ वर्ष साजरी नाही केली दिवाळी

एका मुलाखतीत दीपिका यांनी 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान ४ वर्ष दिवाळी साजरी का केली नाही? याचा खुलासा केला. दीपिका म्हणाल्या की, "रामायण मालिकेचं शूटिंग महाराष्ट्र बॉर्डरवरील उमरगांंव येथे सुरु होतं. त्यावेळी शूटिंगचं लोकेशन आणि कास्ट आणि क्रूचं घर सेटपासून बरंच लांब होतं. वारंवार घरी यायला मिळायचं नाही. या मालिकेचं शूटिंग सलग ४ वर्ष सुरु होतं. त्यामुळे मला दिवाळीला कधीच घरी जायला मिळालं  नाही."

दीपिका पुढे लिहितात की, "दिवाळीला आम्ही सर्व एकत्र सेटवर असायचो. त्यावेळी सर्व कलाकार मिळून दिवाळीचा सण एकत्र साजरा करायचे. शूटिंगचं शेड्यूल खूप व्यस्त असल्याने घरी कोणालाच जाता यायचं नाही. त्यामुळे आम्ही सेटवरच दिवाळी साजरी करायचो." असा खुलासा सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलीया यांनी केला. 'रामायण' मालिका ही खूप गाजली. आजही टीव्ही किंवा युट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही मालिका आवर्जुन पाहिली जाते. 

Web Title: ramayan fame Deepika Chikhalia during the shooting of Ramayan she did not celebrate diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.