बापरे! तगड्या स्टारकास्टला घेऊन बनतोय नितेश तिवारींचा 'रामायण', लारा दत्ताचीही झाली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 09:24 AM2024-01-16T09:24:40+5:302024-01-16T09:26:50+5:30

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची चर्चा जोर धरुन आहे.

Ramayan movie starring Ranbir Kapoor and Sai Pallavi makers offered kaikayi s role to Lara Dutta | बापरे! तगड्या स्टारकास्टला घेऊन बनतोय नितेश तिवारींचा 'रामायण', लारा दत्ताचीही झाली एन्ट्री

बापरे! तगड्या स्टारकास्टला घेऊन बनतोय नितेश तिवारींचा 'रामायण', लारा दत्ताचीही झाली एन्ट्री

नितेश तिवारींच्या 'रामायण' (Ramayan) सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. यावर्षी सिनेमा रिलीज होणार असल्याचं कळतंय. 'रामायण'ची स्टारकास्टही अतिशय तगडी आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेच्या भूमिकेत झळकणार आहे. रावणाच्या भूमिकेसाठी 'केजीएफ' स्टार यशला ऑफर मिळाली आहे. आता कैकयी, हनुमान आणि कुंभकर्ण यांच्या भूमिकांबाबतही अपडेट समोर आली आहे. 

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची सध्या देशभरात  उत्सुकता आहे. त्यातच नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची चर्चा जोर धरुन आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवीची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता नुकतंच कैकयीच्या भूमिकेतबाबतीत माहिती मिळत आहे की. 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार हा रोल अभिनेत्री लारा दत्ताला (Lara Dutta) ऑफर करण्यात आला आहे. तसंच हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलचं (Sunny Deol) नाव सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. शिवाय सनी देओलचा भाऊ बॉबी देओलला (Bobby Deol) कुंभकर्णाची भूमिका ऑफर करण्यात आली आहे. बाकी स्टारकास्टबद्दल अजून चर्चा सुरु आहेत. 

कधी रिलीज होणार 'रामायण'?

नितेश तिवारींचा हा बिग बजेट सिनेमा याचवर्षी रिलीज होईल अशी शक्यता आहे. मार्चमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरु होणार असून वर्षाअखेरपर्यंत सिनेमा रिलीज करण्याचा मेकर्सचा प्रयत्न आहे. 

रणबीर कपूर सध्या Animal चं यश एन्जॉय करतोय. शिवाय त्याचा 'ब्रह्मास्त्र 2' सिनेमाही रांगेत आहे. रणबीरला लेकीलाही वेळ द्यायचा असल्याने त्याने कमीत कमी प्रोजेक्ट करण्याचं ठरवलंय.

Web Title: Ramayan movie starring Ranbir Kapoor and Sai Pallavi makers offered kaikayi s role to Lara Dutta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.