Adipurush : आता आणखी मूर्खपणा..., ‘आदिपुरूष’मधील राम-रावण पाहून  ‘लक्ष्मण’ भडकला...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 02:55 PM2022-10-07T14:55:28+5:302022-10-07T15:00:44+5:30

Adipurush Teaser, Sunil Lahri : ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी ‘आदिपुरूष’च्या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे. 

ramayana actor sunil lahri aka laxman has angry on adipurush-teaser | Adipurush : आता आणखी मूर्खपणा..., ‘आदिपुरूष’मधील राम-रावण पाहून  ‘लक्ष्मण’ भडकला...!!

Adipurush : आता आणखी मूर्खपणा..., ‘आदिपुरूष’मधील राम-रावण पाहून  ‘लक्ष्मण’ भडकला...!!

googlenewsNext

 Adipurush Teaser  :  प्रभास व सैफ अली खानचा ‘आदिपुरूष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीजआधीच वादात सापडला आहे. कालपरवा ‘आदिपुरूष’चा टीझर रिलीज झाला आणि तो पाहून लोकांनी या चित्रपटाला ट्रोल करायला सुरूवात केली. ‘आदिपुरूष’मधील रावण आणि हनुमानाला  पाहून सगळेच बिथरले. सिनेमातील रावण व हनुमानाचा लुक लोकांच्या पचनी पडला नाही. सिनेमातील व्हिएफएक्स दृश्यांवरही लोकांनी नाराजी व्यक्त केली. सिनेमातील कलाकारांची निवडच चुकली, असं म्हणत अनेकांनी या सिनेमाला ट्रोल करायला सुरूवात केली. राजकीय पक्षही या चित्रपटाच्या विरोधात उतरले. फक्त पब्लिसिटीसाठी देव देवतांना चित्रपटात चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा करत भाजपचे राम कदम आक्रमक झालेत. ‘आदिपुरूष’ अशा नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता ‘रामायण’ (Ramayan) मालिकेत लक्ष्मणाची (Lakshman) भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी (Sunil Lahri ) यांनी ‘आदिपुरूष’च्या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे. 

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील लहरी म्हणाले, ‘आदिपुरूषचा टीझर पाहिल्यानंतर सध्या तरी मी तटस्थ नाही. मी ना पूर्णपणे सकारात्मक आहे, ना पूर्णपणे नकारात्मक़ कारण मेकर्सनी टीझरमध्ये केवळ भूमिकांची ओळख करून दिली आहे. ज्यामुळे मी अस्वस्थ होईल, असं सध्या तरी त्यांनी काही दाखवलेलं नाही. माझ्या मते, प्रदर्शनाआधी चित्रपट चर्चेत राहावा, यासाठी विनाकारण असे वाद निर्माण केले जातात. पण यानिमित्ताने मी केवळ एवढंच सांगेल की,या देशात आणखी मूर्खपणा सहन केला जाणार नाही. आमच्या धार्मिक भावना, आमचा धर्म आणि ज्यांना आम्ही देव म्हणून पुजतो त्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. आता हा जुना भारत देश राहिलेला नाही. आता आम्ही एकजूट आहोत. 

व्हीएफएक्स इफेक्ट पचत नाहीत...
आदिपुरूषमधील व्हीएफएक्स इफेक्ट पचत नाहीत. आमच्या काळात हे तंत्रज्ञान फार नवीन होतं. त्यामुळे आम्ही अतिशय मेहनतीने उत्तम ते देण्याचा प्रयत्न केला होता. आज 35 वर्षांनंतरही रामायण मालिकेची लोक प्रशंसा करतात. आमच्यावेळी हे तंत्रज्ञान असतं तर रामानंद सागर यांनी आणखीच अफलातुन असं काही बनवलं असतं. पण आम्ही जे काही बनवलं ते अप्रतिम होतं. त्यामागे कष्ट होते. आजच्या लोकांना मेहनत नको आहे. हनुमानजी राम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर घेऊन जातात, तो सीन शूट करण्यासाठी आम्हाला 4 दिवस लागले होते, असंही सुनील लहरी म्हणाले.


 
‘आदिपुरूष’चा दिग्दर्शक म्हणतो...
याआधी ‘आदिपुरूष’चा दिग्दर्शक ओम राऊत याने चित्रपटावरच्या ट्रोलिंगवर उत्तर दिलं होतं. आम्ही आमच्या चित्रपटात काहीही चुकीचं दाखवलेलं नाही. तुम्ही फक्त काही सेकंदाचा भाग बघितला आहे. त्यातून कोणताही निष्कर्ष काढणं चुकीचं आहे, असं ओम राऊत म्हणाला.   ‘आदिपुरुष’ चित्रपटात साऊथ सुपरस्टार प्रभास लीड रोलमध्ये आहे. त्याच्याशिवाय सैफ अली खान,  अभिनेत्री क्रिती सनॉन, अभिनेता देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांत धडकणार आहे. 

Web Title: ramayana actor sunil lahri aka laxman has angry on adipurush-teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.