'रामायण' फेम अभिनेते अरुण गोविल यांना शूटिंगदरम्यान दुखापत, मदतीसाठी धावले सहकलाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 12:35 PM2023-10-24T12:35:12+5:302023-10-24T12:36:29+5:30
चित्रकूट येथे एका सेटवर हे चित्रीकरण सुरु होतं.
'रामायण' मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) शूटदरम्यान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ते आगामी 'नोटिस' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. त्यांना चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली. तरी वेदनेतच त्यांनी शॉट पूर्ण केला. चित्रीकरणाच्या शेवटच्या शेड्युलमध्ये त्यांना दुखापत झाली होती. चित्रकूट येथे एका सेटवर हे चित्रीकरण सुरु होतं.
'नोटिस' सिनेमात अरुण गोविल दीपिका चिखलिया ही रामायणातील लोकप्रिय जोडी एकत्र दिसणार आहे. रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये त्यांनी राम आणि सीतेची भूमिका केली होती. प्रेक्षक त्यांना खरोखरंच श्रीराम आणि सीता मानायला लागले होते असा त्यांचा अभिनय होता. आजही लोक त्यांना पूजतात. चाहते 'नोटिस' सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. अरुण गोविल यांनी त्यांच्या हिस्स्याचं शूटिंग पूर्ण झालं आहे.
नोटिसचे निर्माते आणि अभिनेते आदित्य प्रताप सूर्यवंशी यांनी सांगितले की एका महत्वाच्या सीनचं चित्रीकरण करत असताना ते जखमी झाले. नारायण गुप्ता यांच्या भूमिकेत असलेले अरुण गोविल यांना एक अधिकारी ताब्यात घेण्यासाठी येतो. या सीनमध्ये जीप ड्रायव्हरने रिव्हर्स घेताना अरुण गोविल यांच्या कोपराला जोरात लागले. सेटवर उपस्थित सर्वच घाबरले. सर्वच त्यांची मदत करण्यासाठी धावले. मात्र त्यांनी दुखापतीनंतरही सीन पूर्ण केला.