'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक! कैकेयी बनली लारा; तर दशरथांच्या भूमिकेत टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:50 PM2024-04-05T12:50:14+5:302024-04-05T12:51:26+5:30

रणबीर कपूरच्या 'रामायण' मधील राजा दशरथ, कैकेयी आणि शूर्पणखाच्या भूमिकेतील कलाकारांचे लूक समोर आले आहेत. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा

'Ramayana' movie set photo leak kaikeyi lara dutta arun govil raja dashrath ranbir sai pallavi | 'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक! कैकेयी बनली लारा; तर दशरथांच्या भूमिकेत टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेता

'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक! कैकेयी बनली लारा; तर दशरथांच्या भूमिकेत टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेता

'रामायण' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षक 'रामायण' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'रामायण' सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. काहीच दिवसांपुर्वी 'रामायण' सिनेमाचा सेट व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता 'रामायण' सिनेमातील कलाकारांचे लूकही लीक झाले आहेत. 

'रामायण' सिनेमात मोठमोठ्या कलाकारांची फौज आहे. सिनेमात लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत झळकत आहे. लाराचा सिनेमातील लूक समोर आलाय. लाराच्या लूककडे नजर गेल्यास तिच्या अंगावर सोन्याचे दागिने दिसत आहेत. लाराने साडी परिधान केली असून ती कैकेयीच्या भूमिकेत सेटवर वावरताना दिसली. तर दुसरीकडे 'रामायण' मधील राजा दशरथाचा लूकही रिव्हिल झालाय. 

राजा दशरथाच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल झळकत आहेत. अरुण गोविल यांनी गाजलेल्या 'रामायण' मालिकेत श्रीरामांची भूमिका साकारली होती. आता 'रामायण' सिनेमात अरुण राजा दशरथाची भूमिका साकारताना दिसत आहेत. अरुणसोबत राम, लक्ष्मण, भरत यांची भूमिका साकारणारे बालकलाकार दिसत असून ते त्यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहेत. 'रामायण' सिनेमा यावर्षी रिलीज होणार असून रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत तर साई पल्लवी सीतामाईंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Web Title: 'Ramayana' movie set photo leak kaikeyi lara dutta arun govil raja dashrath ranbir sai pallavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.