आयकॉनिक जपानी अ‍ॅनिमेटेड फिल्म 'रामायण' या दिवशी होणार थिएटरमध्ये रिलीज, 'या' दिग्गजांनी दिलाय आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:33 IST2025-01-08T14:32:57+5:302025-01-08T14:33:40+5:30

बच्चेकंपनींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी फिल्म रामायण या तारखेला थिएटरमध्ये पुन्हा रिलीज होणार आहे (ramayan movie)

Ramayana The Legend of Prince Rama animated movie release in january | आयकॉनिक जपानी अ‍ॅनिमेटेड फिल्म 'रामायण' या दिवशी होणार थिएटरमध्ये रिलीज, 'या' दिग्गजांनी दिलाय आवाज

आयकॉनिक जपानी अ‍ॅनिमेटेड फिल्म 'रामायण' या दिवशी होणार थिएटरमध्ये रिलीज, 'या' दिग्गजांनी दिलाय आवाज

'रामायण' या महाकाव्याला आपण आजवर हिंदी-मराठी सिनेमा, मालिका, नाटक आणि अन्यही विविध रुपांमध्ये पाहिलंय. आजही 'रामायण' आवडीने पाहिलं जातं. याविषयीची एक बातमी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी 'रामायण- दे लेजेंड ऑफ प्रिन्स राम' ही अ‍ॅनिमेटेड फिल्म थिएटरमध्ये पुन्हा रिलीज होतोय. मूळची जपानी असलेली ही आयकॉनिक क्लासिक फिल्म आता मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी मिळणार आहे.

'रामायण' या तारखेला होणार प्रदर्शित

'रामायण- दे लेजेंड ऑफ प्रिन्स राम' ही अ‍ॅनिमेटेड फिल्म प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २४ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. सिनेमाने याविषयीची ऑफिशिअल घोषणा केलीय. विशेष म्हणजे 4K Ultra Hd साउंडच्या स्पेशल इफेक्ट्स असल्याने 'रामायण- दे लेजेंड ऑफ प्रिन्स राम' ही अ‍ॅनिमेटेड फिल्म पाहणं एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेत झळकणार आहे.


या दिग्गज कलाकारांनी दिलेला आवाज

'रामायण- दे लेजेंड ऑफ प्रिन्स राम' या अ‍ॅनिमेटेड सिनेमासाठी भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गजांनी आवाज दिला होता. रावणाच्या भूमिकेत अमरिश पूरी, श्रीरामांच्या भूमिकेत अरुण गोविल, नम्रता सहानी सीता, शक्ति सिंग लक्ष्मण, आदर्श गौतम भरत तर सिनेमाचे कथावाचक म्हणून शत्रुघ्न सिन्हांनी भूमिका पार पाडली होती. टेलिव्हिजनवर हा सिनेमा प्रचंड हिट झाला. आता थिएटरमध्ये हा सिनेमा पाहण्याची संधी मिळाल्याने सर्व आनंदी असतील, यात शंका नाही.

Web Title: Ramayana The Legend of Prince Rama animated movie release in january

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.