अत्यंत साधेपणाने पार पडलं रामचरणच्या लेकीचं बारसं; चिमुकल्या बाळाचं ठेवलं 'हे' नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 11:46 IST2023-07-04T11:45:46+5:302023-07-04T11:46:31+5:30
Ramcharan daughter: उपासनाने इन्स्टाग्रामवर लेकीच्या बारशाचे काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत

अत्यंत साधेपणाने पार पडलं रामचरणच्या लेकीचं बारसं; चिमुकल्या बाळाचं ठेवलं 'हे' नाव
दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण (Ram Charan) याच्या पत्नीने उपासनाने (Upasana) अलिकडेच एका गोड बाळाला जन्म दिला. त्यामुळे सध्या चिरंजीवी यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. यामध्येच या बाळाचं बारसं झालं असून रामचरण आणि उपासना यांनी त्यांच्या लेकीचं एक सुंदर नाव ठेवलं आहे. उपासनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या लेकीच्या नावाचा खुलासा केला आहे.
उपासनाने इन्स्टाग्रामवर लेकीच्या बारशाचे काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. यात तिने बाळाच्या नावाचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे अमाप संपत्ती असलेल्या या कुटुंबाने अगदी साधेपणाने त्यांच्या बाळाचं बारसं केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये या सेलिब्रिटींच्या साधेपणाची चर्चा आहे.
काय आहे रामचरणच्या लेकीचं नाव?
रामचरण आणि उपासना यांनी त्यांच्या लेकीचं नाव कलिन कारा कोनिडेला असं ठेवलं आहे. ललिता सहस्रनामम या ग्रंथामधून हे नाव घेण्यात आलं आहे. कलिन कारा हे नाव देवी ललिता देवीचंच एक नाव असल्याचं सांगण्यात येतं. याचा अर्थ ऊर्जेचं प्रतिक असा आहे.
लग्नाच्या १० वर्षांनंतर पाळणा हलला
साऊथ मेगास्टार रामचरण आणि उपासना 14 जून 2012 रोजी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर १० वर्षांनी या जोडीने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे रामचरणला मुलगी झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचली. चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्हायरल केली. अपोलो रुग्णालायाचं मेडिकल बुलेटिन व्हायरल झाल्यानंतर रामचरणला लेक झाल्याची माहिती चाहत्यांना मिळाली. तसंच या जोडीनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना माहिती दिली होती.