Ranbir Alia Wedding: लग्नानंतर रणबीर आलिया राहणार त्या १५ मजली इमारतीच्या खास गोष्टी तुम्हाला माहितीय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:04 IST2022-04-14T16:04:00+5:302022-04-14T16:04:36+5:30
Ranbir Alia Wedding: कपूर कुटुंबाची सून होण्यासोबतच आलियाला सर्वात मोठे गिफ्ट मिळणार आहे, ते म्हणजे त्यांचं नवीन घर.

Ranbir Alia Wedding: लग्नानंतर रणबीर आलिया राहणार त्या १५ मजली इमारतीच्या खास गोष्टी तुम्हाला माहितीय का?
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir Kapoor)आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आज म्हणजेच १४ एप्रिलला लग्नबेडीत अडकणार आहेत. कपूर कुटुंबाची सून होण्यासोबतच आलियाला सर्वात मोठे गिफ्ट मिळणार आहे, ते म्हणजे त्यांचं नवीन घर. मागील बऱ्याच काळापासून कपूर कुटुंबाचे हे नवीन घर बनत आहे. मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल परिसरात ही मोठी इमारत बनते आहे. सध्या या इमारतीची सुंदर सजावट करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार या इमारतीतील १५ पैकी ५ मजले कपूर कुटुंबाचे असणार आहेत. तर, उर्वरित मजले भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. लग्नानंतर रणबीर आणि आलिया कृष्णा राज बंगला या त्यांच्या नव्या घरात वास्तव्यास जाणार आहेत. सध्या या घराच्या कामांना प्रचंड वेग आल्याचे दिसते आहे.
१९८० मध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी कृष्णा राज बंगला विकत घेतला होता. या इमारतीचे संपूर्ण काम पूर्ण होण्यास जवळपास ६ वर्षांचा काळ जाईल. पण, तूर्तास त्याचे पाच मजले पूर्ण तयार असल्याचे समजते आहे. ऋषी कपूर यांच्या आठवणीही या घरात जपण्यात येणार आहेत. यात त्यांच्या आवडत्या खुर्चीपासून बुक शेल्फ आणि बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश असणार आहे.
रणबीर आणि आलिया यांच्यासोबत नीतू कपूरसुद्धा या नवीन घरात वास्तव्यास जाणार असल्याचेही बोलले जात आहे. तेव्हा आता आलियाचा या नव्या घरात गृहप्रवेश केव्हा होतो हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.