Ranbir Alia Wedding: सासूने रणबीर कपूरला दिलं २.५ कोटींचं गिफ्ट, तर मेहुण्यांनी लपवलेल्या बुटांच्या बदल्यात रणबीर कपूरकडे मागितली एवढी रक्कम, आकडा वाचून येईल भोवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:23 IST2022-04-16T10:07:22+5:302022-04-16T11:23:10+5:30
Ranbir Alia Wedding: सध्या बी टाऊनमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या रॉयल विवाहाची चर्चा आहे. या विवाह सोहळ्यातील फोटो आणि विधी-रिवाज याबाबत जाणून घेण्यासाठी चित्रपटप्रेमू उत्सुक आहेत.

Ranbir Alia Wedding: सासूने रणबीर कपूरला दिलं २.५ कोटींचं गिफ्ट, तर मेहुण्यांनी लपवलेल्या बुटांच्या बदल्यात रणबीर कपूरकडे मागितली एवढी रक्कम, आकडा वाचून येईल भोवळ
मुंबई - सध्या बी टाऊनमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या रॉयल विवाहाची चर्चा आहे. या विवाह सोहळ्यातील फोटो आणि विधी-रिवाज याबाबत जाणून घेण्यासाठी चित्रपटप्रेमू उत्सुक आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह मुंबईत अगदी साधेपणाने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान आलिया भट्टचं मंगळसुत्र आणि अंगठीनंतर आता रणबीर कपूरला सासुरवाडीतून मिळालेलं गिफ्ट आणि लपवलेल्या बुटांच्या बदल्यात मेहुण्यांनी त्याच्याकडे मागितलेल्या रकमेच्या आकड्याची चर्चा सुरू आहे.
कपूर कुटुंबाकडून आलिया भट्ट हिला एक हिऱ्याची अंगठी मिळाली आहे. तर रणबीर कपूरला त्याची सासू सोनी राजदानकडून खास गिफ्ट मिळाले आहे. त्याची किंमत सुमारे २.५ कोटी रुपये एवढी आहे. सोनी राजदान यांनी रणबीर कपूरला अडीच कोटी रुपये किमतीचं महागडं घड्याळ गिफ्ट दिलं आहे. हे घड्याळ सहजपणे उपलब्ध होत नाही.
दरम्यान लग्नातील बुट लपवण्याच्या रिवाजामध्ये रणबीर कपूरच्या मेहुण्यांनी त्याच्याकडे अशी मागणी केली. ज्याबद्दल ऐकून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. आलिया भट्ट यांच्या गर्लगँगने रणबीर कपूरकडे बुटांच्या बदल्यात तब्बल ११.५ कोटी रुपयांची मागणी केली. दरम्यान, पैशांबाबत खूप रस्सीखेच झाल्यानंतर अखेर पाकिटातून एक लाख रुपये देण्यात आले.
रीतीरिवाजांनुसार लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यात आले. त्यासाठीही भट्ट कुटुंबीयांनी खास तयारी केली होती. आलिया भट्ट हिने स्वत:ही तयारी केली होती. रिटर्न गिफ्ट म्हणून पाहुण्यांना खास अशा काश्मिरी शॉल देण्यात आल्या. या शॉलची निवड खुद्द आलिया भट्ट हिने केली होती.