आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 03:56 PM2019-01-01T15:56:19+5:302019-01-01T15:57:25+5:30
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा आता जुन्या झाल्यात, असे म्हणायला हरकत नाही. होय, कारण नवे वर्ष सुरु झालेय आणि या नववर्षाची सुरुवात आलिया व रणबीरने ‘साथ साथ’ केलीय. त्यामुळे या नव्या वर्षांत दोघांच्याही अफेअरच्या नाहीत तर फुललेल्या प्रेमाच्या कथा ऐकायला मिळणार आहेत.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा आता जुन्या झाल्यात, असे म्हणायला हरकत नाही. होय, कारण नवे वर्ष सुरु झालेय आणि या नववर्षाची सुरुवात आलिया व रणबीरने ‘साथ साथ’ केलीय. त्यामुळे या नव्या वर्षांत दोघांच्याही अफेअरच्या नाहीत तर फुललेल्या प्रेमाच्या कथा ऐकायला मिळणार आहेत.
होय, आलिया व रणबीर सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. याचठिकाणी दोघांनी न्यू ईअर सेलिब्रेशन केले. याचा पुरावा म्हणजे, सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले दोघांचेही फोटो. या फोटोत आलिया व रणबीर कपूरची अख्खी फॅमिली दिसतेय.
न्यूयॉर्कमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून उपचार घेत असलेले रणबीरचे पापा ऋषी कपूरही या फ्रेममध्ये आहेत. रणबीरची मॉम नीतू कपूर, बहीण रिद्धिमा कपूर, असे सगळेही आहेत. एकंदर काय तर आलियाने केवळ रणबीरच्या आयुष्यातचं नाही तर कपूर कुटुंबातही स्थान मिळवले आहे.
याआधीही अनेकदा आलिया रणबीरच्या कुटुंबासोबत दिसली आहे. या वर्षांत रणबीर व आलिया दोघेही लग्न करतील, असेही मानले जात आहे. आलियाचे पापा महेश भट्ट यांनी अलीकडेच याबाबतचे संकेत दिले होते. द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलले होते. आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात आहे, हे जगजाहिर आहे. हे तुम्हीही समजू शकता. मला रणबीर आवडतो. तो व्यक्ति म्हणून खूप चांगला आहे. आता हे नाते कसे पुढे न्यायचे, हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्या दोघांचा आहे. ते लग्नासारख्या कुठल्या मुक्कामाला पोहोचू इच्छितात की आणखी काही, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. मी यावर बोलणारा, निर्णय देणारा कुणीही नाही. त्यांना आपले नाते पुढे त्यांना पूर्ण अधिकार आहे. आयुष्य आपल्या अटींवरचं जगायचे असते. त्यांचे नाते कुठल्या वळणावर जाते,याची आपण प्रतीक्षा करूया. तूर्तास तरी आपण केवळ प्रतीक्षा करू शकतो, असे महेश भट्ट या मुलाखतीत म्हणाले होते.
आलिया व रणबीर आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ शूटिंगमध्ये बिझी आहेत.या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करतोय. याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांत गुंतल्याचे म्हटले जाते. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या.