रणबीर कपूर-आलिया भट असा साजरा करणार राहाचा पहिला वाढदिवस, अभिनेत्याने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 18:07 IST2023-10-26T18:07:03+5:302023-10-26T18:07:41+5:30
Ranbir Kapoor-Alia Bhatt's Daughter Raha : रणबीर कपूर आणि आलिया भटची मुलगी राहा कपूर आता एक वर्षाची होणार आहे. बर्थडे पार्टीचे फोटो पाहण्यासाठी या कपलचे चाहते खूप उत्सुक आहेत.

रणबीर कपूर-आलिया भट असा साजरा करणार राहाचा पहिला वाढदिवस, अभिनेत्याने केला खुलासा
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट(Alia Bhatt)ची मुलगी राहा कपूर (Raha Kapoor) आता एक वर्षाची होणार आहे. बर्थडे पार्टीचे फोटो पाहण्यासाठी या कपलचे चाहते खूप उत्सुक आहेत. रणबीरही आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खूप उत्साहित आहे. या आनंदात आणि जल्लोषात वाढदिवसानिमित्त तो काय करणार आहे हे उघड केले. रणबीर कपूरला जेव्हा त्याच्या मुलीच्या वाढदिवसाच्या प्लॅन्सबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की कुटुंब एका छोट्याशा इंटिमेट पार्टीचे नियोजन करत आहे.
या पार्टीसाठी कुटुंबीय आणि चुलत भावांना आमंत्रित करण्यात आले आहे. रणबीर म्हणाला, "आम्ही तिच्यासाठी घरी फक्त कुटुंब आणि चुलत भावांसोबत एक छोटीशी बर्थडे पार्टी देणार आहोत. राहाच्या पहिल्या वाढदिवसासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत." ६ नोव्हेंबरला राहाचा वाढदिवस आहे.
राहा आता ११ महिन्यांची आहे
रणबीर कपूरने सांगितले की, मुलगी राहाची आवडती तिची आई आलिया नसून वडील रणबीर आहे. याशिवाय रणबीर कपूरने सांगितले की जेव्हा ती पहिल्यांदा तैमूर आणि जेहला भेटली तेव्हा तिने कशी प्रतिक्रिया दिली होती. "राहा एकदा तैमूर आणि जेहच्या घरी गेली होती. तेही घरी आले आहेत. पण ती खूप लहान आहे, ती अजून कोणाला फारशी ओळखत नाही. ती ११ महिन्यांची आहे. आता कुठे ती मला ओळखू लागली आहे आणि मला हे सांगायचे आहे. की मी तिचा फेव्हरेट आहे. आई (आलिया भट) पेक्षाही जास्त, त्यामुळे मी याबद्दल खूप आनंदी आहे."
जेव्हा रणबीर पहिल्यांदा तैमूरला भेटला होता...
रणबीर तैमूरला पहिल्यांदा पाहून कसा थक्क झाला होता, हेदेखील सांगितले. रणबीर म्हणाला, "मी पहिल्यांदा तैमूरला भेटलो तेव्हा मलाही खूप आश्चर्य वाटले. मी म्हणालो, 'किती सुंदर मुलगा आहे'.