‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 01:55 PM2022-04-15T13:55:30+5:302022-04-15T13:56:09+5:30

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding : रणबीर व आलियाचं लग्न हा कपूर कुटुंबासाठी जितका आनंदाचा क्षण होता, तितकाच भावुक करणाराही क्षण होता. ऋषी कपूर यांच्या आठवणीने अख्खं कपूर कुटुंब हळवं झालं होतं.

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding Neetu Kapoor Dedicates This Pic of Dulha To Rishi Kapoor | ‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट

‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट

googlenewsNext

 Ranbir Kapoor  Alia Bhatt wedding : काल रणबीर कपूरनेआलिया भटसोबत लग्नगाठ बांधली. आलिया कपूर घराण्याची सून झाली. पण हे पाहायला रणबीरचे बाबा अर्थात ऋषी कपूर या जगात नव्हते. लेकाचं लग्न व्हावं, अशी त्यांची भरून इच्छा होती. पण त्याआधी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. काल रणबीर व आलियाचं लग्न हा कपूर कुटुंबासाठी जितका आनंदाचा क्षण होता, तितकाच भावुक करणाराही क्षण होता. ऋषी कपूर ( Rishi Kapoor) यांच्या आठवणीने अख्खं कपूर कुटुंब हळवं झालं होतं.

आज नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी अशीच एक हळवी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांना सुद्धा भावुक केलं. नीतू यांनी रणबीरसोबतचा लग्नातील एक सुंदर फोटो शेअर केला. या फोटोत रणबीर नवरदेवाच्या पोशाखात दिसतोय. या फोटोला नीतू यांनी भावुक कॅप्शन दिलं. ‘हे कपूर साहेबांना समर्पित... त्यांची इच्छा पूर्ण झाली...,’असं त्यांनी लिहिलं. त्याआधी नीतू यांनी रणबीर व आलियाचे फोटो शेअर केले होते आणि या फोटोंना ‘My world’ असं कॅप्शन दिलं होतं.

ऋषी कपूर यांना रणबीरच्या लग्नाचे वेध लागले होते...
रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक सुभाष घई यांनी कालपरवा ऋषी यांच्या आठवणींना उजाळा दिला होता.  ऋषी यांना रणबीरच्या लग्नाचे वेध लागले होते, असं त्यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते,‘ऋषीच्या मृत्यूपूर्वी मी त्याला भेटलो होतो. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या होत्या. तेव्हा ते खूप आनंदात होते. मला आठवतंय त्यांनी रणबीर आणि आलियाचं लग्न डिसेंबर 2020 मध्ये करायचं ठरवलं होतं. लेकाचं लग्न धुमधडाक्यात करण्याची त्यांची इच्छ होती.  ते स्वत:च्या मुलाच्या लग्नाची तयारी करण्याचं स्वप्न बघत होते. पण ते आपल्याला दु:खात टाकून निघून गेले.’
 ऋषी कपूर यांचं 30 एप्रिल 2020 रोजी कर्करोगाने निधन झालं होतं. त्यांच्यावर मुंबईतील इस्पितळात उपचार सुरु होते.

Web Title: Ranbir Kapoor Alia Bhatt wedding Neetu Kapoor Dedicates This Pic of Dulha To Rishi Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.