Ranbir-Alia Wedding: रणबीर व आलिया आजच घेणार लग्नाच्या आणाभाका; नीतू कपूर, करण जोहर झालेत भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 10:18 AM2022-04-14T10:18:53+5:302022-04-14T10:20:19+5:30

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: आजचा दिवस कपूर घराण्यासाठी फारच खास आहे. कारण आज आलिया भट कपूर घराण्याची सून होणार आहे.

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Neetu Kapoor karan johar Gets Emotional During Mehendi Wedding | Ranbir-Alia Wedding: रणबीर व आलिया आजच घेणार लग्नाच्या आणाभाका; नीतू कपूर, करण जोहर झालेत भावुक

Ranbir-Alia Wedding: रणबीर व आलिया आजच घेणार लग्नाच्या आणाभाका; नीतू कपूर, करण जोहर झालेत भावुक

googlenewsNext

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding:  आजचा दिवस कपूर घराण्यासाठी फारच खास आहे. कारण आज आलिया भट कपूर घराण्याची सून होणार आहे. होय, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt) आज दुपारी 2 वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. रणबीर व आलियाच्या लग्नाचे विधी कालच सुरू झालेत. पण लग्न कधी होणार? याबद्दलचा संभ्रम कायम होता. लग्न 14 ते 17 या तारखेदरम्यान होणार, असं म्हटलं जात होतं. पण आता लग्नाची तारीख कन्फर्म मानली जात आहे. आज दुपारी 2 ते 4 या दरम्यान लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले जातील.

अचानक बदललं लग्नाचं स्थळ?
लग्नाची तारीख लीक झाल्यामुळे ती अचानक बदलण्यात आल्याची चर्चा आहे. काल 13 एप्रिलला आलिया व रणबीरची मेहंदी सेरेमनी झाली. यानंतर रणबीरची आई नीतू कपूर व बहिण रिद्धिमा यांनी आज 14 तारखेला लग्न असल्याचं कन्फर्म केलं. आधी लग्न आरके हाऊसमध्ये होणार होतं. कारण याच ठिकाणी 42 वर्षापूर्वी रणबीरचे आई-बाबा नीतू कपूर व ऋषी कपूर यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण रिपोर्टनुसार, आता लग्नाच्या स्थळात बदल केला जाणार असल्याचं कळतंय. आता ना लग्न पाली हिलमधील वास्तू अपार्टमेंट होणार ना आर के हाऊसमध्ये. त्याऐवजी मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलचा शोध घेतला जात आहे. मीडिया रणबीरच्या घरापर्यंत पोहोचला. त्यामुळे येथील आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ लागला. यामुळे ऐनवेळी लग्नाच्या स्थळात बदलल्याचं मानलं जातंय.


 
नीतू कपूर भावुक

 काल रणबीर व आलियाच्या मेहंदी सेरेमनीनंतर रणबीरची आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धीमा कपूर  पापराझींसमोर आले. त्यावेळी अनेक फोटोग्राफर्सनी त्यांना आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख नेमकी काय आहे? असा प्रश्न विचारला.  
 यावर उत्तर देताना   नीतू कपूर यांनी फक्त ‘उद्या’ असं उत्तर दिलं. तरीही अनेकांचा विश्वास बसेना. नीतू आताही मस्करी करतेय असं सर्वांना वाटलं. त्यामुळे अनेकांनी कधी? असा पुन्हा प्रश्न केला. यावर ‘अरे लग्न उद्या आहे,’ असं उत्तर त्यांनी दिलं.  
  होणारी सूनबाई  कशी आहे? असा प्रश्न त्यांना केला असता, ‘मी तिच्याबद्दल काय बोलू, ती बेस्ट आहे,’असं त्या म्हणाल्या. नणंदबार्इंनी सुद्धा आलियाचं कौतुक केलं. ‘ती फारच क्यूट आहे’, असं आलियाची होणारी नणंद रिद्धीमा म्हणाली. रिपोर्टनुसार, मेहंदी सेरेमनीत नीतू यांनी ऋषी कपूर यांचे काही किस्से शेअर केलेत. यावेळी त्या भावुक झाल्यात.

करणही झाला इमोशनल
काल मेहंदी सोहळ्यात आलियाचा ‘गार्डियन’ करण जोहर हाही सामील झाला होता. आलियाच्या हातावर रणबीरच्या नावाची मेहंदी सजलेली पाहून करण कमालीचा भावुक झाला होता. आलियाच्या हातावर करणनेच मेहंदी काढली. हा क्षण त्याच्यासाठी खूपच खास होता.
 

Web Title: Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Neetu Kapoor karan johar Gets Emotional During Mehendi Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.