रणबीर कपूर-आलिया भट लेकीसोबत निघाले वॉकला, दिसली राहाची झलक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 15:03 IST2023-01-13T15:02:53+5:302023-01-13T15:03:44+5:30
Alia Bhatt-Ranbir Kapoor : आलिया भट आणि रणबीर कपूर काही महिन्यांपूर्वीच आई बाबा झाले आहेत. अशा परिस्थितीत दोघांनीही आपल्या मुलीला लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रणबीर कपूर-आलिया भट लेकीसोबत निघाले वॉकला, दिसली राहाची झलक !
आलिया भट आणि रणबीर कपूर काही महिन्यांपूर्वीच आई बाबा झाले आहेत. अशा परिस्थितीत दोघांनीही आपल्या मुलीला लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हेच कारण आहे की आजपर्यंत त्यांची मुलगी राहा कपूरचा एकही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाला नाही.
अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोने रणबीर कपूर आणि आलिया भटचे चाहते खूप खूश झाले आहेत. या फोटोत राहा कपूरची झलक दिसत आहे. आलिया भट आणि रणबीर मुलगी राहाला फिरायला घेऊन गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या फोटोमध्ये आलिया भटने मुलगी राहा कपूरला पकडले आहे. या फोटोत रणबीर कपूर आणि आलियासोबत तिची बहीण शाहीन भटही दिसते आहे. तिघांनीही काळ्या रंगाचे पोशाख परिधान केले आहेत. या फोटोतही लोकांना राहाचा चेहरा दिसत नव्हता, मात्र राहाची एक झलक बघूनही चाहते उत्साहित होतात. आलिया भट आणि रणबीर कपूर मुलगी राहाच्या पालनपोषणाबाबत खूप सतर्क आहेत.
आलिया भट, रणबीर कपूरची मुलगी राहा आणि शाहीन भट यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. राहा भटसाठी कमेंट सेक्शनमध्ये लोक भरपूर हार्ट इमोजी पाठवताना दिसले. काही युजर्सनी आलिया आणि रणबीरच्या नो फोटो पॉलिसीचेही कौतुक केले, तर राहाचा चेहरा पाहून अनेक लोक उत्साहित झाले आहेत.