Brahmastra Movie : रिलीज होण्याआधीच 'ब्रह्मास्त्र' पडला 'तख्त'वर भारी, वाचा कसं ते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 14:28 IST2020-01-09T14:26:19+5:302020-01-09T14:28:05+5:30
Brahmastra Movie : 'ब्रह्मास्त्र' आणि 'तख्त' या दोन्ही चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहेत.

Brahmastra Movie : रिलीज होण्याआधीच 'ब्रह्मास्त्र' पडला 'तख्त'वर भारी, वाचा कसं ते?
बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या आगामी चित्रपट 'तख्त'मुळे चर्चेत आहे. करणची निर्मिती असलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटात 'तख्त' सर्वात जास्त महागडा चित्रपट असणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. मात्र असं अजिबात नाही आहे. रिलीज होण्यापूर्वीत 'ब्रह्मास्त्र' सिनेमा 'तख्त'वर भारी पडला आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, करण जोहर सध्या 'तख्त' चित्रपटाच्या बजेटमध्ये काटछाट करण्यात बिझी आहे. त्याला स्वतःलाच तख्तवर जास्त पैसे खर्च करायचे नाही आहेत. तख्त व्यतिरिक्त करणने आधीच ब्रह्मास्त्र व दोस्ताना २सारखे बिग बजेट चित्रपट साईन केले आहेत. यासोबतच करण जोहरच्या बॅनर अंतर्गत बनत असलेला चित्रपट ब्रह्मास्त्र त्याच्या प्रोडक्शन हाऊसचा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर कपूर व आलिया भट मुख्य भूमिकेत आहेत.
अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात रणबीर व आलिया शिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपट निर्मात्यांनी बजेटबाबत गंभीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेपवाइनचं हे म्हणणं आहे की, २०२०मध्ये परदेशात धर्मा प्रोडक्शनच्या कोणत्याच सिनेमाचं शूटिंग होणार नाही. निर्माता काहींना स्क्रॅपदेखील करू शकतो. मागील वर्षी धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत प्रदर्शित झालेला चित्रपट कलंकने बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस करू शकला नव्हता.