सर्वात पहिल्यांदा रणबीर-आलियाची लेक राहा बोलली हा शब्द, अभिनेत्रीने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 10:34 AM2024-09-21T10:34:53+5:302024-09-21T10:35:39+5:30
आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) २०२२ मध्ये एका गोंडस मुलीचे पालक झाले. आलिया आणि रणबीरची मुलगी राहा आता दोन वर्षांची होणार आहे.
आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) २०२२ मध्ये एका गोंडस मुलीचे पालक झाले. आलिया आणि रणबीरची मुलगी राहा आता दोन वर्षांची होणार आहे आणि जेव्हाही ती स्पॉट केली जाते तेव्हा ती मजा करताना दिसते. आलियाने तिच्या प्रेग्नेंसी आणि पालकत्वाबद्दल अनेकदा सांगितले आहे. आता नुकताच तिने खुलासा केला आहे की, राहा सर्वात आधी काय बोलली मम्मा की पप्पा.
राहा कपूर नुकतीच तिची आई आलिया आणि वडील रणबीर कपूरसोबत ट्रिपवर गेली होती. विमानतळावरून त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहा आजी नीतू कपूरला पाहून आनंदी होते आणि काहीतरी बोलू लागते. राहाची ही क्यूट स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.
राहा बोलली हा पहिला शब्द
आलिया भटने एल्यॉर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राहा पहिला शब्द मम्मा बोलणार की पप्पा, यावरून आमच्यात भांडण व्हायचे. आलियाने सांगितले की, राहा बोललेला पहिला शब्द मम्मा होता. हा प्रकार घडला तेव्हा दोघेही खेळत होते. आलियाने मम्मा हा शब्द ऐकताच तिने तिचा फोन घेतला आणि राहाला पुन्हा मम्मा बोलायला सांगितले. त्यानंतर राहा स्पष्टपणे मम्मा म्हणाली होती. तो अभिमानाचा क्षण खूप एन्जॉय केला. कोणाला पुरावे हवे असल्यास राहा बोलत असल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आलिया भटचा जिगरा हा चित्रपट ११ ऑक्टोबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती शर्वरी वाघसोबत अल्फामध्ये दिसणार आहे. लव्ह अँड वॉर या चित्रपटात आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटात विकी कौशलही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.