रणबीर कपूर - आलिया भट्टच्या चित्रपटाची शूटिंग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 11:48 AM2018-02-24T11:48:33+5:302018-02-24T17:20:39+5:30
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट ब्रम्ह्मास्त्रचे शूटिंग आजपासून सुरु झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या धर्मा ...
र बीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट ब्रम्ह्मास्त्रचे शूटिंग आजपासून सुरु झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या धर्मा प्रोडक्शनच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ट्वीट करण्यात आले आहे की, ''आज पासून एका नव्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. या चित्रपटाला घेऊन खूप उत्साहित आहोत. अयान मुखर्जी आणि त्याच्या टीमवर तुमचे प्रेम असेच ठेवा.''
धर्मा प्रोडक्शनने ट्वीटसोबत एक फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटो खूप सारे आयडी कार्डस दिसतायेत. ज्यावर चित्रपट ब्रम्ह्रास्त्रचा लोगो लपवलेला दिसतो आहे.
ब्रम्ह्रास्त्र या चित्रपटाचे शूटिंग रणबीर आणि आलिया भट्ट बल्गेरियामध्ये करतायेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या तयारीसाठी रणबीर, आलिया आणि अयान इस्राईलला जाऊन आले आहेत. यात रणबीरच्या गर्लफ्रेंडची भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे. या चित्रपटात रणबीर आलियाशिवाय बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत. पहिल्यांदाच रणबीर आणि आलिया एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात मौनी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. रणबीरच्या रस्त्यात अडचणी टाकण्याचे काम करणार आहे.
ALSO READ : हातात शस्त्र घेऊन रणबीर कपूर चालला कुठे ?
‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर आलिया व रणबीरमधील जवळीक वाढत असल्याची बातमी मध्यंतरी प्रसारमाध्यमांत उमटली होती. यानंतर केवळ चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी रणबीर व आलियाच्या लिंकअपची बातमी जाणीवपूर्वक पेरली जातेय, असेही कानावर आले होते. केवळ इतकेच नाही तर रणबीरने म्हणे आलियासोबतच्या लिंकअपच्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली असल्याचेही ऐकीवात आले होते. हे सगळे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी असेल तर हा प्रकार ताबडतोब थांबवा, असे त्याने आलिया व ‘ब्रह्मास्त्र’चा निर्माता करण जोहर यांना बजावल्याचेही समजले होते. पण कदाचित या बातम्यांमागे केवळ प्रसिद्धी हे कारण नाहीच. खरे कारण आलियाचे ‘रणबीरमय’ होणे आहे.

Today is the day when we embark on our new journey & we can't wait to unfold every step with you! There's no holding back the excitement for this one, so keep sending in your love for #AyanMukerji & team! #Brahmástra@karanjohar@apoorvamehta18@SrBachchan#RanbirKapoor@aliaa08pic.twitter.com/dX3AjTs3tq— Dharma Productions (@DharmaMovies) February 24, 2018