राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 09:52 IST2025-01-10T09:51:36+5:302025-01-10T09:52:49+5:30

राहाची कृती पाहून पाहाराझीही खूश झालेले पाहायला मिळाले.

Ranbir Kapoor And Alia Bhatt Daughter Raha Kapoor Cute Moment With Parazzi Video Viral | राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल

राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल

Raha Kapoor Video : आलिया भट आणि रणबीर कपूरची (Ranbir Kapoor And Alia Bhatt ) जोडी जेवढी प्रसिद्ध असते, त्याहीपेक्षा जास्त आता त्यांची लेक राहा (Raha Kapoor ) जास्त चर्चेत आहे. राहा कपूर सध्या पापाराझींची आवडती स्टारकिड आहे. सुरुवातीला पापाराझींना पाहून घाबरणारी राहा आता त्यांच्या चांगलीच ओळखीची झालेली पाहायला मिळते. पापाराझींना पाहून राहा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. सध्या असाच राहाचा गोड व्हिडीओ व्हायरल होत आहे.  

राहाने पुन्हा एकदा मनं जिंकून घेतली आहेत. राहाचा खास क्षण कैद झाल्याचं पाहायला मिळालं. नुकतंच रणबीरच्या कडेवर असेलली राहा ही मान वाकवून पापाराझींकडे पाहाताना दिसतेय. यामध्ये ती खूपच गोड दिसत आहे. राहाची कृती पाहून पाहाराझीही खूश झालेले पाहायला मिळाले. यानंतर रणबीर तिला गाडीमध्ये बसवतो. यावेळी ती नेहमीप्रमाणेच रणबीरला बिलगून असलेली दिसत आहे. नंतर बाप-लेक दोघंही गाडीत बसून निघून जातात. 


राहाने कॅमेरासमोर अशा गोंडस अंदाजात कॅमेऱ्यासमोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच विमानतळावर राहा एखाद्या फिल्मस्टारसारखी वागताना दिसली होती. जेव्हा पापाराझींनीही तिला ओरडून 'बाय राहा' असे म्हटले, तेव्हा मागे वळून पापाराझींना हात उंचावून राहा बाय बाय करताना दिसली. एवढेच नव्हे तर ती फ्लाइंग किस देताना दिसत आहे. दरम्यान, राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला आणि रणबीर आलियानं 2023 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी सर्वांना तिची पहिली झलक दाखवली होती.


Web Title: Ranbir Kapoor And Alia Bhatt Daughter Raha Kapoor Cute Moment With Parazzi Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.