फायनली रणबीर आलियाचं ठरलं! डेस्टिनेशन नव्हे तर मुंबईतील 'या' ठिकाणी चाहत्यांसमोर घेणार सप्तपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 11:51 AM2022-04-04T11:51:11+5:302022-04-04T11:52:06+5:30
Ranbir kapoor and alia bhatt: सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंगला पसंती देत आहेत. प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. मात्र, या सगळ्याला आलिया अपवाद ठरत आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि आलिया भट्ट (alia bhatt) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. ही जोडी नेमकी कधी लग्नगाठ बांधणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. मध्यंतरी आलिया आणि रणबीर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ते दोघे एका फॅशन डिझायनरकडे लग्नासाठीचे कपडे डिझाइन करण्यासाठी गेल्याचं सांगण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना जोर आला आहे. यामध्येच आता ही जोडी नेमकं कुठे लग्न करणार हे समोर आलं आहे.
सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंगला पसंती देत आहेत. प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. मात्र, या सगळ्याला आलिया अपवाद ठरत आहे. आलियाने डेस्टिनेशन वेडिंग करण्याऐवजी मुंबईत लग्न करण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाच्या ठिकाणासह लग्नाची तारीखही समोर आली आहे.
'इंडिया टुडे'च्या माहितीनुसार, आलिया आणि रणबीर एप्रिल २०२२ म्हणजे याच महिन्यात लग्नगाठ बांधणार आहेत. या सोहळ्यात जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे ही जोडी चेंबूरमधील आरके हाऊसमध्ये लग्न करणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी ही जोडी राजस्थानमधील उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता ते आरके हाऊसमध्ये लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या लग्नासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, आलिया-रणबीरचे कपडे डिझाइन करणार आहे.