"राहाचा फोटो घेऊ नका", रणबीर-आलियाची विनंती; अभिनेता म्हणाला, "आम्ही केस करु..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:45 IST2025-03-13T18:43:57+5:302025-03-13T18:45:35+5:30
कालच आलियाने पापाराझींसोबत प्री बर्थडे सेलिब्रेट केला. यावेळी ती पापाराझींना काय म्हणाली वाचा.

"राहाचा फोटो घेऊ नका", रणबीर-आलियाची विनंती; अभिनेता म्हणाला, "आम्ही केस करु..."
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटची (Alia Bhatt) क्युट लेक राहा कपूर सर्वांचीच लाडकी आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. मात्र आता आलिया आणि रणबीरने लेकीचे फोटो काढू नका अशी पापाराझींना विनंती केली आहे. सैफ अली खानसोबत झालेल्या त्या दुर्दैवी घटनेनंतर रणबीर-आलियाही सावध झाले आहेत. कालच आलियाने पापाराझींसोबत प्री बर्थडे सेलिब्रेट केला. यावेळी ती पापाराझींना काय म्हणाली वाचा.
आलिया भटचा १५ मार्च रोजी वाढदिवस आहे. मात्र त्याआधीच तिने पापाराझींसोबत सेलिब्रेशन केलं. यावेळी रणबीर कपूरही होता. रणबीर म्हणाला, "मी मुंबईतच जन्माला आलो आणि वाढलो. इंडस्ट्री लहानपणापासूनच पाहिली आहे. तुम्ही सगळेच आम्हाला कुटुंबासारखेच आहात. असं काही कायदेशीर कारवाई करण्याची गरज वाटत नाही. आम्ही तुम्हाला बोलवतो, मुलीचे फोटो घेऊ नका म्हणून विनंती करतो आणि तुम्ही आमचं ऐकता. आम्ही तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करता. त्यामुळे आम्ही याच्यावर केस करु त्याच्यावर केस करु वगरे असं काही नाही. आम्ही तुम्हाला विनंती करु की मुलीचे फोटो घेऊ नका. हे फारच मी विशेष अधिकार असल्यासारखं सांगतोय मला समजतंय. पण आम्ही पालक म्हणून मुलीच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करतो. आजकाल कोणीही फोन काढून शूट करु शकतो आणि ते व्हायरल होऊ शकतं. यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. पण तुम्हाला आम्ही नक्कीच विनंती करु शकतो."
आलिया म्हणाली, "आम्हाला तुमच्यावर काहीही लादायचं नाही. जर आम्ही कधी एअरपोर्टवर गेलो किंव आणखी कुठे गेलो तर राहा गाडीत बसेल किंवा आत जाईल तोवर थांबा. मग आम्ही दोघं येऊन फोटो देऊ. अगदीच कधी तिचा एखादा फोटो काढला तरी ठिके पण अती करु नका."