Ranbir Alia Wedding: ‘भट्ट ब्याह’! अमूलने दिल्या आलिया-रणबीरला हटके शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 07:58 PM2022-04-14T19:58:02+5:302022-04-14T19:59:21+5:30
Ranbir Alia Wedding: अनेक दिवसांच्या गॉसिपनंतर अखेर रणबीर-आलिया विवाहबंधनात अडकले असून, अमूलने आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई: बॉलिवूडमधील दोन स्टार किड्स लग्नाच्या बेडीत अडकले. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा विवाह अतिशय थाटात पार पडला. मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी या दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता दोघांनी आपले नाते अधिकृत केले आहे. वास्तू बंगल्यात दोघेही विवाहबद्ध झाले. देशातील अग्रगण्य कंपनी असलेल्या अमूल (Amul) कंपनीनेही आलिया आणि रणबीरला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
रणबीर आणि आलिया यांच्या विवाहाची बातमी येताच, अमूल कंपनीने ट्विट करत आपल्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. पट्ट मंगनी, भट्ट ब्याह! असे म्हणत एक विशेष फोटोही शेअर केला आहे. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्टला ओळखले जातात. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून उधाण आले होते. कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पण अखेर दोघेही लग्नबंधनात अडकले.
लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी
रणबीर आलियाच्या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. लग्नानंतर आलिया-रणबीर यांनी एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले आहे. या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. १७ एप्रिल रोजी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे रिसेप्शन होणार आहे. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यासाठी खास पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. तसेच कडक सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली होती.
#Amul Topical: The Alia-Ranbir shaadi! pic.twitter.com/AdemkcMWy7
— Amul.coop (@Amul_Coop) April 14, 2022
दरम्यान, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर, करण कपूर, रिमा जैन, करीना कपूर, करिश्मा कपूर, सैफ अली खान, अर्मान कपूर, महेश भट्ट, मुकेश भट्ट, सोनी राजदान, अयान मुखर्जी, करण जोहर, आकांक्षा कपूर आणि अनुष्का कपूर या सेलिब्रटींनी आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती.