लेकीला कडेवर घेऊन नवीन घराचं बांधकाम पाहायला गेले रणबीर-आलिया, राहाने वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 02:17 PM2024-06-25T14:17:25+5:302024-06-25T14:19:11+5:30

रणबीर - आलियाची लेक राहाचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत राहाच्या क्यूटनेस पाहून सर्वांचं मन जिंकलंय (ranbir kapoor, alia bhatt)

Ranbir kapoor and Alia bhatt with daughter raha went to see the construction of the new house | लेकीला कडेवर घेऊन नवीन घराचं बांधकाम पाहायला गेले रणबीर-आलिया, राहाने वेधलं सर्वांचं लक्ष

लेकीला कडेवर घेऊन नवीन घराचं बांधकाम पाहायला गेले रणबीर-आलिया, राहाने वेधलं सर्वांचं लक्ष

रणबीर कपूर - आलिया भट ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी. रणबीर - आलियाची लेक राहाची सुद्धा सोशल मीडियावर चर्चा असते. ५ महिन्यांपुर्वी रणबीर-आलियाने राहाला पहिल्यांदा मीडियासमोर आणलं. तेव्हापासून राहा ही सर्वांची लाडकी बनली आहे. राहा काही दिवसांपूर्वी अनंत अंबानीच्या प्री वेडींग फंक्शनला सुद्धा सहभागी झाली होती. नुकतीच राहा एका ठिकाणी स्पॉट झाली. रणबीर - आलिया तिला कडेवर घेऊन नवीन घराचं बांधकाम पाहायला गेले होते.

नवीन घराचं बांधकाम बघायला गेलं कपूर कुटुंब

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी मंगळवारी त्यांची मुलगी राहासोबत त्यांच्या नवीन घराला भेट दिली. मुंबईतील वांद्रे येथे सुमारे २५० कोटी रुपये खर्चून रणबीर कपूर कुटुंबासाठी नवीन घर बांधत आहे. नवीन घराच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आलिया आणि रणबीर अनेकदा  भेट देतात. यावेळी पहिल्यांदाच ते राहाला आपल्या कडेवर घेऊन आले. 

हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे हे घर लवकरच तयार होणार आहे. रणबीर आणि आलिया याचवर्षी त्यांची लेक राहासोबत दिवाळीचा सण साजरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आलियाची सासू अन् रणबीरची आई नीतू कपूरही यावेळी दिसून आल्या.

रणबीर-आलियाची लेक झाली २ वर्षांची

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे २०२२ साली लग्न झाले. याशिवाय राहाचा २०२२ सालीच ६ नोव्हेंबरला झाला. जवळपास वर्षभर त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा जगाला दाखवला नव्हता. पण ख्रिसमसच्या मुहूर्तावर त्यांनी पापाराझींसमोर येऊन पहिल्यांदाच आपल्या मुलीची झलक दाखवली. पहिल्यांदाच राहाला पाहून सर्वांनी क्यूट म्हणत तिचं कौतुक केलं. रणबीर सध्या 'रामायण' सिनेमाचं शूटींग करतोय.

Web Title: Ranbir kapoor and Alia bhatt with daughter raha went to see the construction of the new house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.