'या' व्यक्तिसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण येणार एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 05:15 AM2018-04-04T05:15:31+5:302018-04-04T10:47:44+5:30

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण हे कधीकाळचे बॉलिवूडमधले सगळ्यात चर्चित कपल होते. मात्र आता दोघांचे रस्ते वेगळे झाले आहे. ...

Ranbir Kapoor and Deepika Padukone to come together for 'this' person! | 'या' व्यक्तिसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण येणार एकत्र!

'या' व्यक्तिसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण येणार एकत्र!

googlenewsNext
बीर कपूर आणि दीपिका पादुकोण हे कधीकाळचे बॉलिवूडमधले सगळ्यात चर्चित कपल होते. मात्र आता दोघांचे रस्ते वेगळे झाले आहे. शेवटचे तमाशा चित्रपट दोघे एकत्र दिसले होते. आता तीन वर्षानंतर पुन्हा एकदा दोघे एकत्र दिसणार आहेत. 

एका फॅशन शोसाठी दोघे एकत्र येणार आहेत. दोघे ही मनीष मल्होत्राच्या अपकमिंग फॅशन मध्ये दिसणार आहेत. 9 एप्रिलला होणाऱ्या मिजवान फॅशन वीकमध्ये रणबीर आणि दीपिका रॅम्प वॉक करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघे यासाठी खास तयारी करतायेत.   

कधी काळी रणबीर आणि दीपिका एकमेकांच्या खूप जवळ होते. मात्र रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना कैफची एंट्र झाली आणि तो दीपिकापासून दूर झाला. यानंतर काहीकाळ दीपिका डिप्रेशनमध्ये सुद्धा गेली होती. काही वर्षांपासून दीपिका आणि रणवीर सिंग रिलेशनशिपमध्ये आहेत. तसेच यावर्षी दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. दीपिका व रणवीर या दोघांनी लग्नासाठी यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यातील चार तारखा निश्चित केल्या आहेत. यापैकी एक तारीख अंतिमत: निश्चित करण्यात येईल. दीपिका व रणवीरचे लग्न एक खासगी सोहळा असेल. केवळ कुटुंबातील व्यक्ती आणि अतिशय जवळचे मित्र व नातेवाईक एवढेच या लग्नात असतील. 

ALSO READ :   लग्नाच्या तयारीला लागली दीपिका पादुकोण 'या' शहरात करतेय कुटुंबीयांसोबत शॉपिंग!
 
लग्नानंतर दीपिका बॉलिवूडमधून संन्यास घेणार असल्याते तिने सांगितले आहे. होय, लग्नानंतर दीपिका अभिनय सोडून आपल्या कौटुंबिक आयुष्यात बिझी होऊ शकते. दीपिकाला म्हणे, लग्नानंतर खूप सारी मुलं हवी आहेत. खुद्द दीपिकाने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. लग्नानंतर कदाचित मी अ‍ॅक्टिंग सोडून फॅमिली लाईफमध्ये बिझी होऊ शकते. माझ्यासाठी कुटुंबापेक्षा मोठे काहीही नाही. मला खूप सारी मुलं हवी आहेत. मला कुटुंबाचे महत्त्व ठाऊक आहे. कुटुंब तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देते, असे दीपिका या मुलाखतीत म्हणाली. अर्थात लग्नाचा प्लान कधी आहे? हा प्रश्न मात्र  दीपिकाने चतुराईने टाळला. मला माहित नाही, मी लग्न कधी करेल. सध्या तरी अशी कुठलीही योजना नाही,असे दीपिका म्हणाली.

Web Title: Ranbir Kapoor and Deepika Padukone to come together for 'this' person!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.