रणबीर कपूर अन् दीपिकाच्या 'ये जवानी है दिवानी' सिक्वेल येणार ? चाहत्यांचा आनंद गगनात मावेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:03 IST2024-12-25T12:02:45+5:302024-12-25T12:03:31+5:30
निर्मात्यांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

रणबीर कपूर अन् दीपिकाच्या 'ये जवानी है दिवानी' सिक्वेल येणार ? चाहत्यांचा आनंद गगनात मावेना!
काही सिनेमे असतात, जे प्रेक्षकांचे ऑलाटाईम फेवरेट असतात. असाच एक सिनेमा म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा 'ये जवानी है दिवानी'. हा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा 2013 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 295 कोटी रुपये कमवले होते.
रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, कल्की कोचलिन आणि आदित्य रॉय कपूर या चौघांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्षे उलटून गेली आहेत, तरीही लोकांमध्ये त्याची क्रेझ संपलेली नाही. चाहते अनेकदा सोशल मीडियावर सिनेमाच्या सीक्वलबद्दल विचारत असतात. अशातच आता निर्मात्यांकडून अशी एक पोस्ट समोर आली आहे, ज्यानंतर या चित्रपटाचा सीक्वल येणार की काय, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून चाहते उत्साहित झाले आहेत. धर्मा प्रॉडक्शनने 'ये जवानी है दिवानी' एक बीटीएस फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दीपिका पदुकोण, कल्की कोचलिन, रणबीर कपूर आणि आदित्य रॉय कपूर दिसून येत आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "आम्ही याच्या प्रेमात पडणार...पुन्हा!". यावरुन रणबीर-दीपिकाच्या चित्रपटाचा सिक्वेल येत असल्याची चर्चा आता रंगली आहे. आता निर्मात्यांनी फक्त बीटीएस फोटो सहजच शेअर केले आहेत की चाहत्यांना सिनेमाच्या सिक्वेलची हिंट दिली आहे, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. चाहते आता अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.