Tu Jhuthi Mai Makkar : रणबीर श्रद्धाचा 'तू झुठी मै मक्कार' ओटीटीवर येण्यास सज्ज, 'या' दिवशी प्रदर्शित होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 14:26 IST2023-05-02T14:24:06+5:302023-05-02T14:26:36+5:30
लव्ह रंजन दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला.

Tu Jhuthi Mai Makkar : रणबीर श्रद्धाचा 'तू झुठी मै मक्कार' ओटीटीवर येण्यास सज्ज, 'या' दिवशी प्रदर्शित होणार
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांची मुख्य भूमिका असलेला 'तू झुठी मै मक्कार' (Tu Jhuthi Mai Makkar) सिनेमा ८ मार्च रोजी रिलीज झाला होता. लव्ह रंजन दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. रणबीर-श्रद्धाची ही फ्रेश जोडीही प्रेक्षकांना भलतीच पसंतीस पडली. बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये रोमँटिक कॉमेडी बघायला मिळाली. आता सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.
'नेटफ्लिक्स'ने सोशल मीडियावरुन रिलीजची घोषणा केली आहे. होळीच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाने दर्शकांचे मनोरंजन केले. नेटफ्लिक्सने फिल्मचं पोस्टर रिलीज करत लिहिले, "तु्म्ही पडताळणी करु शकता ही हे खोटं नाही. तू झूठी मे मक्कार ३ मे रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे."
'तू झुठी मै मक्कार' सिनेमात रणबीर कपूर, श्रद्धा कपूर यांच्यासोबतच बोनी कपूर, डिंपल कपाडिया सारखे कलाकारही होते. प्रेक्षकांकडून सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. 95 कोटी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी 14 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर सिनेमाने एकूण 146.6 कोटी रुपयांची कमाई केली.