VIDEO : लव रंजनच्या सिनेमातील रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा डान्स व्हिडीओ लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 04:27 PM2022-03-19T16:27:03+5:302022-03-19T16:29:02+5:30

Ranbir Kapoor And Shraddha Kapoor : या व्हिडीओत रणबीर आणि श्रद्धा डान्स सीक्वेंस शूट करताना दिसत आहे. रणबीर कपूर रॉयल ब्लू कुर्ता घालून दिसत आहे.

Ranbir Kapoor and Shraddha Kapoor dance sequence from Luv Ranjan film leaked | VIDEO : लव रंजनच्या सिनेमातील रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा डान्स व्हिडीओ लीक

VIDEO : लव रंजनच्या सिनेमातील रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा डान्स व्हिडीओ लीक

googlenewsNext

(Image Credit : Aajtak)

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर Shraddha Kapoor) सध्या दिग्दर्शक लव रंजनच्या सिनेमासाठी शूटिंग करत आहेत. या सिनेमाचं शूटिंग दिल्लीमध्ये सुरू आहे. अशात या सिनेमाच्या सेटवरून एक व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओत रणबीर आणि श्रद्धा गाण्याचं शूटिंग करताना दिसत आहेत. श्रद्धा आणि रणबीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत रणबीर आणि श्रद्धा डान्स सीक्वेंस शूट करताना दिसत आहे. रणबीर कपूर रॉयल ब्लू कुर्ता घालून दिसत आहे. तर श्रद्धा यलो कलरच्या साडीमध्ये दिसत आहे. हे शूटिंग एका ग्रॅंड लोकेशनवर सुरू आहे. सेटवर अनेक डान्सर्स नाचताना दिसत आहेत. बघून असं वाटत आहे की हे एका लग्नातील गाण्याचं शूट होत आहे. 

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा हा पहिलाच एकत्र सिनेमा आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक लव रंजन हा सुद्धा दोघांना पहिल्यांदाच डिरेक्ट करत आहे. या सिनेमात बोनी कपूर रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. तसेच डिंपल कपाडिया रणबीरच्या आईची भूमिका साकरणार आहे.
 

Web Title: Ranbir Kapoor and Shraddha Kapoor dance sequence from Luv Ranjan film leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.