लांब केस अन् हातात कुऱ्हाड, रणबीर कपूरचा अ‍ॅक्शन अवतार; Animal चा धांसू प्री-टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 12:57 PM2023-06-11T12:57:41+5:302023-06-11T12:59:55+5:30

पांढरा शर्ट आणि धोती, लांब केस, दाढी आणि हातात कुऱ्हाड घेऊन रणबीरची एंट्री होते.

ranbir kapoor animal film action movie pre teaser released starring rashmika mandanna anil kapoor bobby deol | लांब केस अन् हातात कुऱ्हाड, रणबीर कपूरचा अ‍ॅक्शन अवतार; Animal चा धांसू प्री-टीझर रिलीज

लांब केस अन् हातात कुऱ्हाड, रणबीर कपूरचा अ‍ॅक्शन अवतार; Animal चा धांसू प्री-टीझर रिलीज

googlenewsNext

Animal Pre Teaser : अभिनेता रणबीर कपूरच्या  (Ranbir Kapoor) आगामी 'अ‍ॅनिमल' (Animal) सिनेमाची जोरदार चर्चा आहे. नुकताच सिनेमाचा प्री टीझर रिलीज झाला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित अ‍ॅनिमल चित्रपटात रणबीर कपूरसह अनिल कपूर (Anil Kapoor) , रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), बॉबी देओल (Bobby Deol) आणि तृप्ति डिमरी (Tripti Dimri) अशी तगडी स्टारकास्ट आहे. या प्री टीझरमध्ये रणबीर कपूरचा अ‍ॅक्शन अवतार बघायला मिळतोय.

पांढरा शर्ट आणि धोती, लांब केस, दाढी आणि हातात कुऱ्हाड घेऊन रणबीरची एंट्री होते. त्याचा हा अवतार पाहून चाहत्यांच्या उत्साह गगनात मावेनासा झालाय मास्कमध्ये असलेल्या गुंडांवर रणबीर कुऱ्हाडीने एकामागे एक वार करताना दिसतोय. या प्री टीझरमध्ये रणबीरचा पूर्ण चेहरा दाखवलेला नाही. पण त्याची एख झलक पाहून चाहते अक्षरश: वेडे झालेत. सोबतच पंजाबी गाण्याचा तडका दिला आहे. अ‍ॅक्शन आणि ड्रामा अशा मिक्स प्री टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

अ‍ॅनिमल फिल्मची नक्की कथा काय असेल याचा अद्याप काहीही खुलासा करण्यात आलेला नाही.रणबीर कपूरने एका मुलाखतीत ही एक क्राईम ड्रामा असल्याचं सांगितलं होतं. वडील आणि मुलाच्या या कहाणीत असे काही ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. यामध्ये रणबीर कपूर ग्रे शेडेड अवतारात पाहायला मिळणार आहे. 11 ऑगस्ट रोजी सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: ranbir kapoor animal film action movie pre teaser released starring rashmika mandanna anil kapoor bobby deol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.