रणबीर कपूर शूटिंगसाठी पोहचला दिल्लीत, चाहत्यांनी केले जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 05:47 PM2021-01-11T17:47:49+5:302021-01-11T17:48:17+5:30

रणबीर कपूर दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून दिल्लीला पोहचला आहे.

Ranbir Kapoor arrives in Delhi for shooting | रणबीर कपूर शूटिंगसाठी पोहचला दिल्लीत, चाहत्यांनी केले जंगी स्वागत

रणबीर कपूर शूटिंगसाठी पोहचला दिल्लीत, चाहत्यांनी केले जंगी स्वागत

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून दिल्लीला पोहचला आहे. दिल्ली विमानतळावर रणबीरच्या चाहत्यांनी जंगी स्वागत केले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ त्याच्या एका चाहत्याने तयार केला आहे. 

लव रंजनच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूरसोबतश्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्रद्धा देखील चित्रपटाच्या टीमसह दिल्लीला पोहोचली आहे. तिने नुकतेच चित्रपटाच्या टीमसह हॉटेलमधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. येत्या २-३ दिवसांत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. 

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो अयान मुखर्जीचा चित्रपट ब्रह्मास्त्रमुळे चर्चेत आले. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मौनी रॉय व्हिलनच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

रणबीर कपूर शेवटचा राजकुमार हिराणीचा चित्रपट संजूमध्ये झळकला होता. हा चित्रपट संजय दत्तच्या जीवनावर आधारीत होता. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.

अनेक सेलिब्रेटी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसले. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या कपलने. पहिल्यांदाच कपूर आणि भट्ट फैमिली ने राजस्थानमध्ये रणथंभौर येथे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन करण्यासाठी गेले होते. तीन दिवस दोन्ही कुटुंबाने एकत्र वेळ घालवला. एयरपोर्टवर रणबीर कपूरआलिया भट्ट, नीतू सिंह, शाहिन भट्ट, सोनी राजदान , अयान मुखर्जी दिसले होते. दोन्ही कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Web Title: Ranbir Kapoor arrives in Delhi for shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.