कमाईच्या बाबतीत रणबीर ठरला अनिल कपूरपेक्षा वरचढ; 'Animal’ साठी घेतलं अव्वाच्या सव्वा मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 03:55 PM2023-06-12T15:55:19+5:302023-06-12T15:56:08+5:30

Ranbir kapoor: मानधनाच्या बाबतीत रणबीरने यावेळी अनेक दिग्गज कलाकारांना मागे टाकले आहे.

ranbir kapoor charged 70 crore for animal know rashmika anil kapoor bobby deol fee | कमाईच्या बाबतीत रणबीर ठरला अनिल कपूरपेक्षा वरचढ; 'Animal’ साठी घेतलं अव्वाच्या सव्वा मानधन

कमाईच्या बाबतीत रणबीर ठरला अनिल कपूरपेक्षा वरचढ; 'Animal’ साठी घेतलं अव्वाच्या सव्वा मानधन

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) सध्या त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ (Animal)  या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत असून नुकताच त्याचा प्री टीझर रिलीज झाला. हा प्री टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक भारावून गेले आहेत. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये रणबीर मुख्य भूमिका साकारत असून यात तो अॅक्शन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर रणबीरची चर्चा रंगली आहे. यामध्येच या सिनेमासाठी त्याने तगडं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याचं मानधन हे अनिल कपूरपेक्षा (anil kapoor) कैकपटीने जास्त आहे.

'बॉलिवूड लाइफ'च्या वृत्तानुसार, या सिनेमासाठी सर्वात जास्त मानधन रणबीर कपूरने घेतलं आहे. तर, सर्वात कमी फी राघव बिनानी आणि बिपीन कार्की यांना मिळालं आहे. इतकंच नाही तर रणबीरने कमाईच्या बाबतीत एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर यांनाही पिछाडीवर टाकलं आहे.

अ‍ॅनिमलसाठी रणबीरने तब्बल ७० कोटी रुपये मानधन आकारलं आहे. तर, रश्मिका मंदानाने (rashmika mandana) ४ कोटी रुपये फी घेतली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रश्मिका आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या सिनेमामध्ये अनिल कपूर रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्यांननी २ कोटी रुपये फी घेतली आहे. तर, बॉबी देओलनेही ४ कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. दरम्यान, हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
 

Web Title: ranbir kapoor charged 70 crore for animal know rashmika anil kapoor bobby deol fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.