रश्मिकाबरोबर 'सामी सामी' गाण्यावर रणबीर कपूरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 17:38 IST2023-11-27T17:38:08+5:302023-11-27T17:38:33+5:30
रणबीर कपूर त्याच्या आगामी 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणबीरबरोबर या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत आहे.

रश्मिकाबरोबर 'सामी सामी' गाण्यावर रणबीर कपूरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणबीरबरोबर या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत आहे. सध्या रणबीर आणि रश्मिका 'ॲनिमल' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. 'ॲनिमल'च्या प्रमोशनसाठी नुकतंच त्यांनी 'इंडियन आयडॉल' या रिएलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. रणबीर आणि रश्मिकाचा 'इंडियन आयडॉल'च्या मंचावरील एक व्हिडिओ समोर आला आहे.
रश्मिका मंदाना तिच्या 'पुष्पा' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होतं. 'पुष्पा'मधील रश्मिकाचं 'सामी सामी' हे गाणंही प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यातील तिची हुक स्टेपही लोकप्रिय ठरली होती. आजही अनेक कार्यक्रमात या गाण्यांवर चाहते थिरकताना दिसतात. रणबीर कपूरलाही रश्मिकाच्या या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. 'इंडियन आयडॉल'च्या मंचावर रश्मिकासह रणबीर 'सामी सामी' गाण्यावर थिरकला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#AlluArjun
— Allu Arjun fan ikkadaa (@AAFanIkkadaa) November 26, 2023
Icon Star @alluarjun Saami Saami Song Step by #AnimalMovie Team.#AlluArjun#PushpaTheRise#PushpaTheRule#Pushpa2TheRule#Pushpa2pic.twitter.com/FzYZtWP0Qc
या व्हिडिओत श्रेया घोषाल तिच्या सुमधूर आवाजात 'सामी सामी' गाणं म्हणताना दिसत आहे. रणबीर आणि रश्मिकाबरोबर गायक कुमार सानू यांनी देखील 'सामी सामी' गाण्यावर ठेका धरल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. दरम्यान, रणबीर-रश्मिकाचा 'ॲनिमल' सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर, रश्मिका यांच्यासह अनिल कपूर, बॉबी देओल या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.