'रामायण'मधील भूमिकेवर पहिल्यांदाच बोलला रणबीर कपूर, Animal Park अन् 'ब्रह्मास्त्र २' बाबत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 10:17 AM2024-12-09T10:17:11+5:302024-12-09T10:18:02+5:30

Animal Park चं शूट सुरु होण्यास २०२७ उजाडणार?

Ranbir Kapoor first time talks about Ramayan movie also gives update on Animal park and brahmastra 2 at jeddah red sea international film festival 2024 | 'रामायण'मधील भूमिकेवर पहिल्यांदाच बोलला रणबीर कपूर, Animal Park अन् 'ब्रह्मास्त्र २' बाबत...

'रामायण'मधील भूमिकेवर पहिल्यांदाच बोलला रणबीर कपूर, Animal Park अन् 'ब्रह्मास्त्र २' बाबत...

रणबीर कपूरसाठी (Ranbir Kapoor) २०२३ वर्ष हे खूप खास होतं. त्याच्या Animal या सिनेमाने चांगलाच बिझनेस केला. यामुळे रणबीरच्या फ्लॉप सिनेमांचं ग्रहण सुटलं. यानंतर रणबीर आगामी बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. 'ब्रह्मास्त्र २', 'Animal पार्क', 'रामायण', 'लव्ह अँड वॉर' हे चित्रपट रांगेत आहेत. सध्या रणबीर 'रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर' सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.'रामायण' मधील भूमिका हा ड्रीम रोल असल्याचं तो नुकतंच म्हणाला.

रणबीर कपूरने जेद्दाह येथे झालेल्या रेड सी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या अनेक प्रोजेक्ट्सवर चर्चा केली. नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाविषयी तो म्हणाला, "माझं सध्या रामायण सिनेमाचं काम सुरु आहे. ही एक सर्वात श्रेष्ठ पौराणिक कथा आहे. माझा लहानपणीचा मित्र नमित मल्होत्रा खूप मन लावून हा सिनमा बनवतोय. सर्व क्रिएटिव्ह लोक या सिनेमाशी जोडले गेले आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शन करत आहेत. त्यामुळे मी या सिनेमाचा भाग असणं हे माझ्यासाठी ड्रीम रोल सारखंच आहे. सिनेमाच्या पहिल्या पार्टचं शूट पूर्ण झालं आहे. दुसऱ्या भागाचं लवकरच सुरु होईल. श्रीरामाची भूमिका साकारता आली यासाठी मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. या सिनेमात सर्वकाही आहे. भारतीय संस्कृती काय आहे हे आपल्याला सिनेमा शिकवतो. कुटंबाचं महत्व, नवरा बायकोचं नातं याविषयी आपण बरंच शिकतो."

तर दुसरीकडे डेडलाईन हॉलिवूडशी बोलताना रणबीरने 'अॅनिमल पार्क',  'ब्रह्मास्त्र २' चे अपडेट दिले. तो म्हणाला, "संदीप रेड्डी वांगा यांनी जेव्हा मला अॅनिमलची ऑफर दिली तेव्हाच हा प्रोजेक्ट तीन पार्टमध्ये असणार हे निश्चित होतं. २०२७ मध्ये अॅनिमल पार्कचं शूटिंग सुरु होईल. नंतर पार्ट ३ वरही काम होईल. माझी भूमिका आणखी इंटरेस्टिंग असणार आहे कारण मी हिरो आणि व्हिलन अशा दोन्ही रोलमध्ये आहे. "

'ब्रह्मास्त्र २' विषयी तो म्हणाला, "पहिला पार्ट शिव या टायटलचा होता. देव हे पार्ट २ चं टायटल असणार आहे. याची कथा सध्या लिखाणाच्या स्टेजवर आहे." आलिया भट पार्ट २ मध्ये असणार का? यावर रणबीर म्हणाला, 'नक्कीच असणार'.

Web Title: Ranbir Kapoor first time talks about Ramayan movie also gives update on Animal park and brahmastra 2 at jeddah red sea international film festival 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.