रणबीर कपूरने सलमान खानला दिले असे सडेतोड उत्तर, ऐकून होईल भाईचा तीळपापड!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 12:49 PM2018-06-15T12:49:28+5:302018-06-15T18:19:28+5:30
तूर्तास रणबीर कपूर ‘संजू’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रत्येकजण रणबीरच्या प्रेमात पडला. पण ...
त र्तास रणबीर कपूर ‘संजू’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रत्येकजण रणबीरच्या प्रेमात पडला. पण एका व्यक्तिने मात्र हा ट्रेलर पाहून नाक मुरडले होते. ही व्यक्ती होती सलमान खान. होय, ‘संजू’च्या ट्रेलरबद्दल विचारल्यावर सलमानने वेगळेच उत्तर दिले होते. कुणीच संजय दत्तच्या भूमिकेला न्याय देऊ शकत नाही. त्याच्या बायोपिकमध्ये त्यानेचं काम करायला हवे होते, असे सलमान म्हणाला होता.
तुझ्या वयात अमिताभ, अनिल कपूर अशा अभिनेत्यांनी चरित्र भूमिका साकारणे सुरू केले होते. तू अद्यापही हिरोच्याच भूमिका साकारतो आहेस, याबाबत सलमानला प्रश्न केला गेला होता. यावर उत्तर देताना सलमानने अप्रत्यक्षपणे रणबीरवर निशाणा साधला होता. केवळ मीच नाही तर अक्षय कुमार, आमिर खान, शाहरूख खान हेही हेच करताहेत. संजय दत्तही हे करू शकला असता. स्वत:च्या बायोपिकमध्ये त्याने स्वत:चं स्वत:ची भूमिका साकारायला हवी होती. माझ्या मते, अन्य कुणी त्याच्या भूमिकेला न्याय देऊ शकत नाही. किमान या बायोपिकमधील गत ८ ते १० वर्षांतील संजय त्याने स्वत:चा पडद्यावर उभा करायला हवा होता, असे सलमान म्हणाला होता. त्याचे हे उत्तर रणबीरला डिवचणारे होते. त्यामुळे रणबीर यावर काय बोलतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर रणबीर बोललाच.
होय, रणबीरने सलमानला अगदी सडेतोड उत्तर दिले. ‘ज्याच्यावर चित्रपट बनवला, त्याच व्यक्तिने त्यात काम केले, असे आजपर्यंत कुठल्याही बायोपिकमध्ये झालेले नाही. अशाने त्या व्यक्तिरेखेचा प्रभाव संपतो. मला आधीच ठाऊक होते की, मला पडद्यावर बघून लोक संजय दत्तशी माझी थेट तुलना करतील. त्यामुळे मी या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. एक अभिनेता संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारतो आहे, हे लोकांनी मला पाहून म्हणावे, इतकीच माझी अपेक्षा आहे. शेवटी मी दुसरा संजय दत्त बनू शकत नाही, हे मला ठाऊक आहे,’ असे रणबीर म्हणाला. एकंदर काय तर त्याने सलमानचे दात सलमानच्याच तोंडात घातले.
ALSO READ : सलमान खानला का आवडला नाही ‘संजू’तील रणबीर कपूरचा अभिनय?